नाशिक

शहरात स्वाइन फ्लूचे संकट

128 जणांना लागण, डेंग्यूचेही साठ रुग्ण

नाशिक : प्रतिनिधी
शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यूसह साथीचे आजार नियंत्रणात असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जात असताना, शहरात सध्याच्या घडीला स्वाइन फ्लूचे तब्बल 171 वर पोहोचली आहे. यात 128 रुग्ण शहरातील असून, 43 रुग्ण ग्रामिण भागातील आहे. दरम्यान, डेंग्यूची रुग्णसंख्याही 60 च्या घरात गेली आहे. यामुळे आरोग्य विभागाला स्वाइन फ्लू व डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहेत.
आरोग्य विभागाने 5 लाख 31 हजार 913 लोकांची तपासणी केली असून, एकूण 1 लाख 42 हजार 448 घरांत जाऊन तपासणी केली आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवातील गर्दीमुळे स्वाइन फ्लूचा आकडा वाढल्याचे बोलले जात आहे. सप्टेंबरमध्ये आणखी सहा बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूने आतापर्यंत अकरा जणांचा बळी घेतला आहे. त्यात महापालिका हद्दीतील तीन, तर ग्रामीण भागातील सहा जणांचा समावेश आहे. सोबतच मृतांमध्ये एक मालेगाव, तर एक सांगलीच्या रुग्णाचा समावेश आहे. स्वाइन फ्लूबरोबरच डेंग्यूचाही कहर पाहायला मिळत आहे. शहरात 161 वर डेंग्यूच्या रुग्णसंख्येत भर पडली आहे. डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. शहरात जानेवारी ते जूनपर्यंतच्या सहा महिन्यांत स्वाइन फ्लूचे जेमतेम सात रुग्ण होते. जुलैपासून पावसाला सुरुवात होताच स्वाइन फ्लूचा आलेख वाढत गेल्याचे दिसत आहे. जुलैमध्ये 28, तर ऑगस्टमध्ये 119, तर सप्टेंबरमध्ये 171 रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णालयात सध्यास्थित 52 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Swine flu crisis in the city

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago