नाशिक

सिन्नर बाजार समितीत भाजीपाला बाजारासाठी 21 गाळ्यांचा लिलाव लवकरच

सभापती शरदराव थोरात : वार्षिक सभेत विविध विकासकामांचा आढावा

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर नगर परिषद हद्दीतील भाजीपाला वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला आहे. समितीच्या आवारातील पेट्रोलपंपालगतच्या पहिल्या मजल्यावरील 21 गाळ्यांची लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती शरदराव थोरात यांनी दिली.
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 27) समितीच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात सभापती थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांंच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात झाली.
सभापती थोरात यांनी बाजार समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पेट्रोलपंपालगतच्या पहिल्या मजल्यावरील 21 गाळ्यांचा लिलाव बाजार समितीच्या आवारातच घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. इच्छुकांनी समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
या सभेत बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी वार्षिक अहवालाचे, तर लेखापाल डी. जे. राजेभोसले यांनी आर्थिक पत्रकाचे वाचन केले. आर्थिक पत्रकांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
संचालक रवींद्र शेळके यांनी मनोगत व्यक्त करताना 2023 पासून संचालक मंडळाकडे बाजार समितीची सूत्रे आल्यानंतर खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामे करण्यात आल्याचे सांगितले. मुख्य बाजार आवारातील रस्त्यांचे डांबरीकरण, लिलावासाठी वाहने उभी राहणार्‍या ठिकाणी खडीकरण तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या क्षमतेची टाकी उभारण्यात आल्याने शेतकरी व बाजार समितीतील विविध घटकांना सुविधा उपलब्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी संचालक सुनील चकोर यांच्यासह शेतकरी व सभासद उपस्थित होते. केशव केकाटे, प्रसाद लढ्ढा, गणेश बुचकुल, भारत पोटे, उत्तम डावरे, विकास झाडे, कैसर कुरेशी, जुबेर सय्यद, सुदाम जाधव, खंडेराव जायभाये तसेच कर्मचारीवृंद उपस्थित होते. संचालक सुनील चकोर यांनी आभार मानले.

हिवरगावला सुरू करणार कांदा लिलाव

हिवरगाव येथे गट क्रमांक 3/1 मधील सहा हेक्टर जागा समितीने शासनाकडून संपादित करून घेतली आहे. परिसरातील शेतकर्‍यांची गैरसोय दूर करण्यासाठी हिवरगाव येथील या नवीन जागेत लवकरच कांदा शेतमालाचे लिलाव सुरू करण्यात येणार असल्याचे संचालक रवींद्र शेळके यांनी सांगितले.

 

Auction for 21 vegetable market stalls at Sinnar Market Committee to be held soon.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago