18 दिवसांत रुग्णांची संख्या 114, डेंग्यूचेही 50 रुग्ण
नाशिक : प्रतिनिधी
शहरात ऐन गणेशोत्सव काळात स्वाइन फ्लूचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अवघ्या 18 दिवसांत स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या 114 वर पोहोचली आहे. सध्या शहरात डेंग्यू, मलेरिया आणि तापसदृश आजारापाठोपाठ आता स्वाइन फ्लूचा उद्रेक पाहायला मिळत आहे. स्वाइन फ्लू हा एच1एन1 नावाच्या इन्फ्लूएन्झा विषाणूमुळे होणारा श्वसनाचा आजार आहे. आतापर्यंत या आजारामुळे शहरातील तिघांचा, तर ग्रामीणमधील आठ अशा एकूण अकरा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूचेही रुग्ण झपाट्याने वाढत असून, तीन आठवड्यांत रुग्णसंख्या 46 वर गेली आहे.
सध्या गणेशोत्सव असल्याने देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे स्वाइन फ्लूबाधितांच्या संख्येत अचानक वाढ होत असल्याचे दिसत आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये स्वाइन फ्लूमुळे पाच जणांचा बळी गेला होता. सप्टेंबरमध्ये आणखी सहा बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे स्वाइन प्लूने आतापर्यंत अकरा जणांचा बळी घेतला आहे. त्यात महापालिका हद्दीतील तीन, तर ग्रामीण भागातील सहा जणांचा समावेश आहे. सोबतच मृतांमध्ये एक मालेगाव, तर एक सांगलीच्या रुग्णाचा समावेश आहे. स्वाइन फ्लूबरोबरच डेंग्यूचाही कहर पाहायला मिळत आहे.
शहरात 147 वर डेंग्यूच्या रुग्णसंख्येत भर पडली आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत डेंग्यूचे 56 रुग्ण होते. ऑगस्टमध्येच 45 नवे रुग्ण आढळले, तर सप्टेंबरच्या तीन आठवड्यांत 46 जणांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे डेंग्यूबाधितांचा आकडा 147 पर्यंत पोहोचला आहे. डेंग्यूमुळे बळीची नोंद नसल्याने वैद्यकीय विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. शहरात जानेवारी ते जूनपर्यंतच्या सहा महिन्यांत स्वाइन फ्लूचे जेमतेम सात रुग्ण होते. जुलैपासून पावसाला सुरुवात झाल्यापासून स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत गेला. जुलैमध्ये 21, तर ऑगस्ट महिन्यात 119 जणांना या आजाराची बाधा झाली. सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत 114 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे स्वाइन फ्लूबाधितांचा आकडा 261 वर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सप्टेंबरमध्ये आतापर्यंत सहा जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे.
वातावरण बदल ठरतोय पोषक
स्वाइन फ्लू आजार खोकल्यामुळे किंवा शिंकण्यामुळे हवेतील थेंबांमार्फत एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे वेगाने पसरतो. हवामान बदलाच्या काळात याचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. पावसात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने स्वाइन फ्लूच्या व्हायरसचे विषाणू दीर्घकाळ जिवंत राहतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक पटीने वाढतो.
Swine flu outbreak in the city
- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…
- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…
- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…
आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…