कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी केली पाहणी
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि जगद्गुरू शंकराचार्य यांच्यासह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे. अवघ्या 40 दिवसांवर आलेल्या या भव्य सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी प्रशासनाने आता वेग घेतला आहे.
कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी सोमवारी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशावर्त तीर्थ परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. मंदिर प्रांगणातील फरसबंदी आणि कुशावर्त घाटावरील सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला व पुरातत्त्व विभागाला आवश्यक सूचना दिल्या. यावेळी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर, मंदिर विश्वस्त डॉ. सत्यप्रिय शुक्ल, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह सर्व गटनेते, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी नागरिकांची समिती स्थापन करून नियोजनात त्यांचा सहभाग वाढवण्यावर आयुक्तांनी विशेष भर दिला.
दशक्रिया विधीसाठी गैरसोय
कुशावर्त तीर्थ घाटावर सुरू असलेल्या कामांमुळे परिसर बंद करण्यात आल्याने दशक्रिया विधीसाठी नागरिकांची गैरसोय होत असल्याची बाब स्थानिकांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्र्यंबकेश्वर शहर व पंचक्रोशीतील सुमारे 50 हजार लोकवस्तीसाठी दशक्रिया विधीकरिता कुशावर्त हा एकमेव घाट आहे. मात्र, नगर परिषदेने कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने शोकप्रसंगी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या अत्यंत संवेदनशील समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पर्यायी व्यवस्था उभी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela: Preparations for Flag Hoisting Ceremony Begin
- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…
- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…
- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…
आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…