नाशिक

जिल्ह्यातील तीन गावे, 21 वाड्यांना टँकरच्या फेर्‍या

एप्रिलच्या प्रारंभीच जाणवू लागल्या टंचाईच्या झळा

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात एकीकडे अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान होत असताना दुसरीकडे, पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत असल्याचे विरोधाभासी चित्र समोर आले आहे. ग्रामीण भागात विहिरी, कूपनलिका आणि लहान जलस्रोत आटत चालल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
सध्या जिल्ह्यातील 24 गावे व वाड्यांमधील सुमारे सात हजार 830 लोकसंख्येसाठी पाच टँकर कार्यरत आहेत. यात तीन गावे आणि 21 वाड्यांचा समावेश आहे. देवळा तालुक्यातील एका गावात, इगतपुरी तालुक्यातील दोन गावे व सात वाड्या तसेच सिन्नर तालुक्यातील 14 वाड्यांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत. या भागात पाण्याचे नैसर्गिक स्रोत कोरडे पडल्याने प्रशासनाला टँकरचा पर्याय वापरावा लागत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या कमी असली, तरी उन्हाची तीव्रता वाढत असल्याने एप्रिल व मे महिन्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तापमानात वाढ झाल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून, साठ्यात हळूहळू घट होत आहे.
जिल्ह्यातील धरण समूहात सध्या 48.94 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 60.78 टक्के साठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात 39.36 टक्के, तर गंगापूर धरणात 65.63 टक्के पाणीसाठा होता. यावरून एकूण साठा वाढलेला असला, तरी गंगापूर धरणातील साठा घटल्याचे स्पष्ट होत आहे. पाणीटंचाईची ही परिस्थिती कायम राहिल्यास ग्रामीण भागासोबतच शहरांनाही पाणीपुरवठ्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Tanker rounds to three villages and 21 houses in the district

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

22 hours ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

22 hours ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

22 hours ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

23 hours ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

23 hours ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

23 hours ago