format: 0; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0039,0.0000; brp_del_sen:0.3000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2621440;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 238.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 38;
नाशिक : प्रतिनिधी
पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात भक्तांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन होणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे पाच वाजता अभिषेक व पूजनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी 6.11 वाजता श्री हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा व महाआरती होईल. सकाळी 7 वाजता हनुमान चालीसाचे सामूहिक पठण आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता हवन, पूर्णाहुती व महाआरती पार पडणार आहे. त्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी सात वाजता पुण्यनगरी येथील सुप्रसिद्ध कलाकारांचा सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम होणार आहे. दिवसभर भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमाचे आयोजन पंचमुखी हनुमानभक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. महंत भक्तिचरणदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे.
शहरातील दक्षिणमुखी सोन्या मारुती, दुतोंड्या मारुती, श्री गोमय मारुती मंदिर, श्रीक्षेत्र अंजनेरी येथील हनुमान मंदिर या प्रमुख मंदिरांसह शहरातील सर्वच हनुमान मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना लाडू व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
Hanuman birth anniversary today; Program at Panchmukhi Hanuman temple
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…