नाशिक

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष

सिन्नर : प्रतिनिधी
फळ्यावर अक्षरे गिरविणारे शिक्षकांचे हात जेव्हा खडक फोडतात, खड्डे खोदतात आणि रोपांना पाणी घालतात, तेव्हा शिक्षणाचा खरा अर्थ कृतीतून दिसतो. माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या शहा (ता. सिन्नर) येथील श्री. भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी दोन दशकांत खडकाळ व उंच-सखल असलेला सहा एकर परिसर 850 हून अधिक वृक्षांनी हिरवागार केला आहे.
या हिरवाईमुळे दररोज 85 हजार लिटरपेक्षा अधिक ऑक्सिजन निर्माण होतो. तर सुमारे 20 टन कार्बन शोषला जात असल्याचा अंदाज आहे.
सुमारे 20 वर्षांपूर्वी खडकाळ व उंच-सखल परिसरात पर्यावरण संवर्धन उपक्रमाला सुरुवात झाली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत श्रमदानातून टेकड्या सपाट करून खडक फोडत वृक्षांसाठी खड्डे तयार केले. यातून वृक्षलागवडीसाठी जागेसोबतच मैदानही तयार झाले. दोन दशकांत विद्यालय परिसरात तीन हजारांहून अधिक वृक्षांची लागवड झाली. निंब, वड, पिंपळ, चिंच यांसह विविध देशी वृक्षांची लागवड व संगोपन आजही सुरू आहे.
वृक्षलागवडीनंतर त्यांचे संगोपन हे मोठे आव्हान होते. विद्यालयात पाण्याची पुरेशी व्यवस्था नसतानाही शिक्षक व विद्यार्थ्यांनी सुमारे एक किलोमीटरवरून पायी चालत पाणी आणून रोपे जगविली. उन्हाळ्यात तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असतानाही रोपांची नियमित निगा राखली. केवळ वृक्षलागवडीपेक्षा त्यांचे संगोपन करून ते मोठे करण्यावर भर दिला. आज परिसरातील 850 हून अधिक मोठी झाडे या सातत्यपूर्ण परिश्रमांची साक्ष देत आहेत. नव्याने लागवड केल्या जात असलेल्या वृक्षांना संस्थेने पाण्याची व्यवस्था करून
दिली आहे.

शाळेच्या आवारातून गावागावांत पोहोचली हिरवाई

विद्यालयाचा पर्यावरण संवर्धन उपक्रम केवळ आवारापुरता मर्यादित राहिला नाही. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, उपाध्यक्ष दौलतराव मोगल, ज्येष्ठ संचालक विजय गडाख, कार्यकारी संचालक अभिषेक गडाख आदींच्या संकल्पनेतून शहा, कारवाडी, रामपूर, मिरगाव व विघ्नवाडी येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षांत गावांमध्ये, घरांच्या परिसरात व शेताजवळ 10 हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. शिक्षकांनी लागवडीनंतरच्या संगोपनावरही लक्ष दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे यापैकी चार हजारांहून अधिक वृक्ष आज मोठे झाले आहेत.

ज्ञानदानासोबत पर्यावरण संवर्धन करणार्‍या या विद्यालयात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक व क्रीडा सुविधांची गरज आहे. लोकप्रतिनिधी, उद्योजक, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देण्याची गरज आहे.
-माधव शिंदे, प्राचार्य

फळ्यावर अक्षरे गिरविणारे हात जेव्हा खडक फोडतात, वृक्षांसाठी खड्डे खोदतात आणि उन्हातान्हात रोपांना पाणी घालतात, तेव्हा शिक्षक केवळ शिकवत नाहीत; ते पुढची पिढी घडवत असतात.
-अण्णासाहेब गडाख, अध्यक्ष, माध्यमिक लोकशिक्षण मंडळ

Teachers cultivated greenery in rocky soil.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 hours ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 hours ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

3 hours ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

3 hours ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

3 hours ago

कुंभमेळ्यापूर्वी रस्त्यांचे जाळे होणार मजबूत

रस्ते विकासासाठी 17 हजार कोटींचा निधी नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रस्ते…

3 hours ago