नाशिक

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात

नाशिक : प्रतिनिधी
वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण होणार्‍या कचर्‍याच्या व्यवस्थापनाबाबतही महापालिकेने स्वतंत्र नियम व जबाबदार्‍या स्पष्ट केल्या आहेत. बांधकाम अथवा पाडकामातून निर्माण होणारा कचरा रस्त्यावर, नाल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता महापालिकेच्या अधिकृत यंत्रणेमार्फतच त्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, कुठेही उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. विषेशत: घनकचरा विभागाचे पथक अस्वच्छता करणार्‍यांचा शोध घेत आहे.
वीस हजार चौरसमीटरपेक्षा जास्त बांधकाम क्षेत्र असलेल्या, दररोज 40 हजार लिटरपेक्षा अधिक पाणी वापरणार्‍या किंवा दररोज शंभर किलोपेक्षा अधिक घनकचरा निर्माण करणार्‍या आस्थापनांचा या वर्गात समावेश होतो. गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, रुग्णालये, मॉल्स, शैक्षणिक संस्था, तसेच इतर पात्र आस्थापनांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून ओल्या कचर्‍यावर स्वतःच्या स्तरावर कंपोस्ट खतनिर्मिती किंवा जैववायू निर्मितीद्वारे प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. विकेंद्रित पद्धतीने कचर्‍यावर प्रक्रिया होऊन शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. भारत सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयामार्फत अधिसूचित करण्यात आलेल्या या नियमांची नाशिक महापालिका क्षेत्रात 1 एप्रिल 2026 पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. नागरिक, व्यापारी, संस्था, आस्थापना आणि इतर घटकांच्या सहभागावर विशेष भर देण्यात आला आहे. स्रोतावरच कचरा वर्गीकरणाला प्राधान्य नियमांनुसार प्रत्येक नागरिक, संस्था व आस्थापनेने निर्माण होणारा कचरा ओला कचरा, सुका कचरा, स्वच्छताविषयक कचरा आणि विशेष काळजी घेऊन हाताळावयाचा कचरा, अशा चार प्रकारांत स्वतंत्रपणे वर्गीकृत करून देणे अपेक्षित आहे.
कचर्‍याचे योग्य वर्गीकरण, स्वतंत्र संकलन, पुनर्प्रक्रिया आणि शास्त्रोेक्त पद्धतीने विल्हेवाट यामुळे कचरा साठवणूक केंद्रांवरील कचर्‍याचा भार कमी करण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, रस्ते किंवा नाल्यांमध्ये कचरा फेकणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नियमांचे पालन करून शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नियमभंग करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, उघड्यावर थुंकणे व शौच करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, गुटखा व ई-सिगारेटचे सेवन यांसारख्या कृतीवरही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर टप्प्याटप्प्याने दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. एकदाच वापरून फेकून देण्यात येणार्‍या प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावरही निर्बंध लागू आहेत.

Tracking down those who litter the city

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 hours ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 hours ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

3 hours ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

3 hours ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

3 hours ago

कुंभमेळ्यापूर्वी रस्त्यांचे जाळे होणार मजबूत

रस्ते विकासासाठी 17 हजार कोटींचा निधी नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रस्ते…

3 hours ago