नाशिक

दहा तालुक्यांना अवकाळीचा तडाखा

39 हजार शेतकरी बाधित, एकाच दिवसात 28 हजार हेक्टर पिके मातीमोल

नुकसान भरपाईची मागणी.
द्राक्ष, कांदा, डाळिंबाला फटका.
शेतकरी आर्थिक अडचणीत.
हातातोंडाशी आलेला घास हिरावला.
रब्बी पिकांचे मोठे नुकसान.

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर कायम आहे. गुरुवारी (दि. 2) झालेला पाऊस व गारपिटीचा तडाखा दहा तालुक्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरम्यान, एकाच दिवसात 39 हजार शेतकर्‍यांचे 28 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात भाग बदलत होत असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीट आणि वादळी वार्‍यांसह झालेल्या पावसामुळे हाताशी आलेली रब्बी पिके मातीमोल झाली आहेत. शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शासनाने त्वरित पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
हवामान खात्याने गुरुवारी (दि. 2) जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार जिल्ह्यातील 10 तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपले. यात 39 हजार 814 शेतकर्‍यांचे 28 हजार 364 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
यापूर्वीहीदेखील 18 मार्चला, 270 हेक्टर, तर 29 मार्चला 482 तर 1 एप्रिलला झालेल्या अवकाळी पावसामुळे 3 हजार 33 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, उभ्या पिकांसह काढणीस आलेल्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
मालेगाव, सटाणा, देवळा, नाशिक, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. विशेषतः बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाने सर्वाधिक कहर केला असून, मोठ्या क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील इतर काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेती मोठ्या संकटात सापडली आहे. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदत व पंचनाम्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

कांदा, गहू, डाळिंबाला सर्वाधिक फटका

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा, गहू व डाळिंब या पिकांना बसला आहे. 22 हजार 726 हेक्टर कांदा, तर गहू एक हजार 920 हेक्टर आणि एक हजार 798 हेक्टरवरील डाळिंब फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

Ten talukas hit by unseasonal rain

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जुन्या वादातून युवकाचा कोयत्याने खून…या भागात घडली घटना

सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा…

19 hours ago

सोशल मीडियावरही ’आयपीएल’चा फीव्हर; हिताचे रक्षण व्हायला हवे!

आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…

2 days ago

मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…

2 days ago

गणवेश-साहित्य खरेदीत शाळांच्या सक्तीला लगाम!

पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…

2 days ago

सिन्नरमध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम

‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…

2 days ago

कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…

2 days ago