दसवेल गावाजवळ डंपर- कंटेनरची भीषण धडक

सटाणा : प्रतिनिधी
तालुक्यातील दसवेल गावाजवळ साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. वाळूचा डंपर आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन एका चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी चालकावर ताहाराबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूचा डंपर (क्र. 15 9293) हा ताहाराबादकडून पिंपळनेरकडे जात होता. त्याचवेळी कंटेनर (क्र. 50 8342) हा पिंपळनेरकडून ताहाराबादकडे येत असताना दसवेल गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात डंपरचालक किसन सोमनाथ मुंडे (वय 45, रा. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीसपाटील रवींद्र निकम यांनी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना कळविले. त्यानंतर हवालदार रामराव शेरे, दिनेश जाधव, अरुण वणसे आणि राकेश काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला. मृत चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

 

Terrible collision between dumper and container near Dasvel village

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

49 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

56 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

1 hour ago