नाशिक

भोंदू खरातच्या 2,000 कोटींच्या साम्राज्याला सुरुंग!

आयकर आणि जीएसटी विभागाने फास आवळला

नाशिक : विशेष प्रतिनिधी
अध्यात्म आणि ज्योतिषाच्या नावाखाली शेकडो महिलांचे शोषण करणार्‍या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. केवळ लैंगिक अत्याचारच नव्हे, तर खरातने उभ्या केलेल्या ’काळ्या’ साम्राज्याचा पर्दाफाश झाला असून, त्याची तब्बल दोन हजार कोटींची मालमत्ता आता केंद्र सरकारच्या आर्थिक गुन्हे शाखांच्या रडारवर आली आहे. उत्पन्न लपविल्याप्रकरणी आयकर विभाग आणि करचुकवेगिरीप्रकरणी जीएसटी विभागाने खरातच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिक, अहिल्यानगर आणि मुंबईसह राज्याच्या विविध भागांत खरातने मोठी गुंतवणूक केली आहे. यात बेनामी जमिनी, आलिशान बंगले आणि व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश मालमत्ता त्याच्या पत्नी, मुले आणि निकटवर्तीयांच्या नावावर असल्याचे समजते. खरातने केवळ भक्तांना गंडवूनच नव्हे, तर शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावून आणि खंडणीच्या माध्यमातून हे अफाट साम्राज्य उभे केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
खरातच्या बँक खात्यांमधील कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार आणि उत्पन्नाचा कोणताही अधिकृत स्रोत नसताना जमवलेली ही संपत्ती पाहून आयकर विभाग सक्रिय झाला आहे.
आयकर विभाग
खरातच्या पन्नासहून अधिक स्थावर मालमत्तांची कागदपत्रे आता इन्कम टॅक्सच्या ताब्यात आहेत. उत्पन्नाचे मूळ स्रोत आणि ’मनी लाँड्रिंग’च्या कोनातून तपास सुरू आहे.
जीएसटी विभाग
खरातच्या काही ट्रस्ट आणि बनावट कंपन्यांद्वारे झालेल्या आर्थिक व्यवहारांत जीएसटीची मोठी चोरी झाल्याचे समोर आले आहे. सेवाकराचे नियम धाब्यावर बसवून त्याने शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे.
थोडक्यात सांगायचे तर… खरातची पोलीस कोठडी 1 एप्रिल रोजी संपली असतानाच, आर्थिक गुन्हेगारांप्रमाणेच आता त्याच्यावर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे. भक्तांच्या श्रद्धेचा बाजार मांडून जमवलेली ही संपत्ती आता सरकारच्या तिजोरीत जमा होणार का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

एसआयटी आणि केंद्रीय यंत्रणांचा समन्वय

आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (एसआयटी) खरातचे डिजिटल पुरावे आणि जप्त केलेले मोबाईल फोन क्लोन केले आहेत. यातून मिळालेल्या आर्थिक माहितीच्या आधारे आता केंद्रीय यंत्रणा समांतर तपास करत आहेत. खरातने आपली काळी कमाई सफेद करण्यासाठी कोणत्या उद्योजकांची किंवा नेत्यांची मदत घेतली, याचाही शोध घेतला जात आहे.

The 2,000 crore empire of the fraudster Kharat is destroyed!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

खिशात नाही आणा…

खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…

6 hours ago

गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…

6 hours ago

स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात…

6 hours ago

शेतीमातीची माणसं…

शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…

6 hours ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

6 hours ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

7 hours ago