नाशिक

महिनाभरात 70 कोटी करवसुलीचे आव्हान

300 कोटींपैकी 229 कोटींची मनपाची वसुली

नाशिक : प्रतिनिधी

मिळकतदारांकडील मालमता कर वसुलीसाठी मनपाच्या कर विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात कर विभागाला मनपा आयुक्तांनी तीनशे कोटी मालमत्ता वसुलीचे टार्गेट दिले होते. त्यांपैकी मंगळवार(दि.24)पर्यंत 229 कोटींची वसुली करण्यात महापालिकेला यश आले आहे.
नाशिक महापालिकेत सहा लाखांच्या आसपास घरपट्टीधारक आहेत. दरम्यान, कर विभाग दरवर्षी चालू मागणीसह वर्षानुवर्षे रखडून पडलेल्या थकबाकी वसुलीसाठी सवलतीच्या योजना राबवल्या जातात. मागील आर्थिक वर्षात मनपाने 257 कोटींची ऐतिहासिक करवसुली केली होती. त्यानंतर आता कर विभागाला 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता तीनशे कोटी वसुलीचे टार्गेट दिले आहे. चालू मागणीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कर विभागाला प्रभावीपणे मोहीम राबवावी लागणार आहे.
महापालिका हद्दीतील घरे, रिकामे प्लॉट मिळकतधारकांकडून दरवर्षी घरपट्टी कर आकारली जातेे. दरम्यान, महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत घरपट्टी व पाणीपट्टीतून मिळणारा कर आहे.
यंदा घरपट्टीची चालू मागणी तीनशे कोटींच्या घरात आहे. वर्षानुवर्षे थकबाकी थकवणार्‍यांच्या थकबाकीचा आकडा सातशे कोटींच्या पुढे गेला आहे. महापालिका प्रशासन थकबाकी वसुलीकरिता दरवर्षी अभय योजनेद्वारे शास्तीवर थेट 90 टक्के सूट देत असतेे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांसाठी चारशे कोटींचे कर्जरोखे उभारण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे.
महापालिका आयुक्तांनी कर विभागाला चालू वर्षात तीनशे कोटींचे टार्गेट दिले आहे. सध्याच्या घडीला 30 टक्के वसुली झाली असून, उर्वरित महिनाभरात चालू घरपट्टी वसुलीचे आव्हान आहे.

बाराशे जणांना नोटिसा

थकबाकी वसुलीसाठी सहाही विभागांत 5 मार्चपर्यंत मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर विभागाने आतापर्यंत बाराशे जणांना जप्तीच्या नोटिसा धाडल्या आहेत. येत्या काही दिवसांत आणखी जप्तीच्या नोटिसा दिल्या जाणार आहेत.

चालू मागणीसह थकबाकी वसुलीकरिता जप्ती वॉरंट बजावण्यास सुरुवात केली आहे. मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील कर भरून मनपाला सहकार्य करावे.
– सुवर्णा दखणे, उपायुक्त, कर विभाग, महानगरपालिका, नाशिक

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

खिशात नाही आणा…

खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…

12 hours ago

गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…

13 hours ago

स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात…

13 hours ago

शेतीमातीची माणसं…

शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…

13 hours ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

13 hours ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

13 hours ago