समिती येता दारी, फलक लावण्याची घाई भारी

प्रभारी सीईओंच्या सूचनेनंतर झळकला विशाखा समितीचा फलक

नाशिक : प्रतिनिधी
महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधक फलक कोणत्याही खासगी, निमशासकीय, शासकीय कार्यालयांत लावणे बंधनकारक आहे, पण त्र्यंबकरोडवरील नवीन नाशिक जिल्हा परिषद कार्यालयाला उशिरा जाग आली असून, नुकताच या इमारतीत अंतर्गत तक्रार निवारण समितीचा फलक लावण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या खासगी कारणास्तव सुटीवर असून, प्रभारी म्हणून प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर तत्परतेने म्हणा किंवा महाराष्ट्र विधिमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या अध्यक्ष मोनिका राजळे व इतर सदस्य आज, दि. 15 मेस नाशिक जिल्हा परिषदेला भेट देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत तक्रार समितीचा फलक झळकला असावा, अशी चर्चा आहे. उशिरा का होईना जिल्हा परिषदेला जाग आली.
गेल्या वर्षापासून नाशिक जिल्हा परिषदेत महिला कर्मचार्‍यांवरील लैंगिक छळ प्रकरणाने राज्यात चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत अंतर्गत समितीचा फलक लावण्याची तत्परता दाखविण्यात आली होती. नवीन जिल्हा परिषदेचे उदघाटन 13 नोव्हेंबर 2025 ला करण्यात आले होते. प्रत्येक शासकीय, खासगी, निमशासकीय आस्थापनांमध्ये कामकाजाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) कायदा-2013 नुसार दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांत अंतर्गत तक्रारी समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसा फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे उदघाटन होऊन सात महिन्यांनी अंतर्गत तक्रार समितीचा फलक झळकला.

The committee is in a hurry to put up the signs, the door is open.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *