नाशिक

जिल्ह्यात 110 दिवस पुरेल एवढाच चारा

जिल्हा परिषदेच्या तीन कोटींच्या अतिरिक्त निधीला प्रशासकीय मान्यता

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवल्यास जनावरांसाठी चारा उपलब्ध करून तो तालुुकास्तरावरून थेट जनावरांपर्यत पोहोचविण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे. त्यासाठी तीन कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे करण्यात आली होती. त्याला आता प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सुरवातीच्या टप्प्यात गरजेनुसार चारा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिली.
जिल्ह्यातील पशुधन आणि उपलब्ध चारा साठ्याचा विचार करून संभाव्य टंचाईच्या काळात वितरणाचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सुमारे 17 लाख 60 हजार 828 पशुधन आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेला चारा जानेवारी 2027 अखेरपर्यंत पुरेल, असा प्राथमिक अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतर फेब्रुवारी ते जुलै 2027 या सहा महिन्यांच्या कालावधीत चार्‍याची संभाव्य गरज लक्षात घेऊन प्रशासनाने उपाययोजनांचे नियोजन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तीन कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी केली होती.
जिल्ह्यातील पशुधनासाठी पुढील सहा महिन्यांत सुमारे 11 लाख टन चार्‍याची आवश्यकता भासण्याचा अंदाज आहे. ही संभाव्य टंचाई लक्षात घेता चारा उत्पादन वाढविणे, शेतकर्‍यांना चारा बियाणे उपलब्ध करून देणे आणि पर्यायी चारा उत्पादन पद्धतींना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत चारा व्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेकडील उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण 17 लाख 60 हजार 828 पशुधन आहे. दररोज सहा लाख 80 हजार 644 टन असल्याची नोंद करण्यात आली आहे. या साठ्याच्या आधारे जिल्ह्यात सरासरी 110 दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे चित्र आहे. अतिरिक्त निधीतून चारा उपलब्धतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. दृष्काळसद़ृश परिस्थितीत जनावरांना चारा मिळण्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. चारा छावण्या किंवा डेपो सुरू करण्याऐवजी सुरवातीच्या टप्प्यात आवश्यक ठिकाणी चारा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल. तालुकास्तरावरून चार्‍याची गरज लक्षात घेऊन त्याचे वितरण करण्याचे नियोजन आहे.

जिल्ह्यात दृष्काळसदृश परिस्थिती उद्भवल्यास जनावरांसाठी चार्‍याची उपलब्धता करून तो तालुकास्तरावरून जनावरांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी जि.प.ने तीन कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी केली होती. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, पुढील नियाजन सुरू करणार आहे.
– ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक

चार्‍याच्या नियोजनासह बियाण्याच्या उपलब्धतेसाठी तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्याला आता प्रशासकीय मान्यता मिळाली असून, प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने केल्या जात आहेत.
– डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील पशुधन,
चारा व सद्यःस्थिती
तालुका      एकूण पशुधन       पुरवठा (शिल्लक चारा किती दिवस पुरेल)
मालेगाव        2,68,740                                         98
बागलाण       2,05,817                                        102
कळवण        1,12,919                                          122
नांदगाव       1,82,424                                          115
सुरगाणा      59,758                                              128
नाशिक        62,543                                             107
दिंडोरी          92,564                                             107
इगतपुरी      66,769                                             111
पेठ              37,209                                             128
निफाड        1,14,989                                           107
सिन्नर       1,65,327                                             87
येवला         1,45,820                                            96
चांदवड       1,04,595                                            102
त्र्यंबकेश्वर 69,788                                               119
देवळा        71,566                                                125
एकूण        17,60,828                                          110

The district has only enough fodder to last for 110 days.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नाशिकचा श्वास, व्यवस्थेचा फास!

- वाहिद बागवान ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांतून वाहणारा मंद, शीतल वारा…

5 minutes ago

समुद्राच्या पाण्यातून लिथियम

- डॉ. किशोर पवार आपल्या भूतलावर 70% भूप्रदेश सागर, महासागर यांनी व्यापलेला आहे. महासागर म्हणजे…

12 minutes ago

जीवघेणे प्रदूषण आणि वाढती वाहनसंख्या

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सध्या प्रतिदिन वर्तमानपत्रांत बातम्या वाचायला मिळत आहेत. जगातील सर्वांत प्रदूषित शहरांच्या सूचीत…

18 minutes ago

पाकिस्तानधार्जिणे

काश्मीरचे दोन भाग आहेत. एक पाकिस्तानात, तर दुसरा भारतात आहे. पाकिस्तानातील काश्मिरी समाधानी नाहीत. त्यांना…

22 minutes ago

पिंपळगावमध्ये बंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व…

55 minutes ago

येवल्यात स्वामी समर्थ केंद्रात चोरट्यांचा डल्ला

भाविकांत संताप; दानपेटीतील रोकड अन् सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास येवला : प्रतिनिधी शहरातील पारेगाव रोड परिसरातील…

59 minutes ago