नाशिक

एसटी प्रवासातील चिल्लरची कटकट संपली

तिकीटदर पाच रुपयांच्या पटीत; निफाड-नाशिक 95, लासलगाव-नाशिक 130 रुपये

निफाड : विशेष प्रतिनिधी
एसटी बसच्या तिकिटासाठी एक-दोन रुपयांची चिल्लर नसल्याने प्रवासी आणि वाहक यांच्यात वारंवार होणार्‍या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) 13 टक्के भाडेवाढ लागू करतानाच तिकीटदर पाच रुपयांच्या पटीत निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिकीट काढताना सुट्ट्या पैशांवरून होणारा गोंधळ कमी झाला असून, प्रवासी आणि वाहक दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नव्या तिकीटदरांची घोषणा करताना सर्व तिकीटदर पाच रुपयांच्या पटीत निश्चित केल्याचे स्पष्ट केले होते. या निर्णयामुळे तिकीट वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ होत आहे. नवीन दरानुसार निफाड ते नाशिक प्रवासासाठी आता 95 रुपये, लासलगाव ते नाशिक प्रवासासाठी 130 रुपये, तर येवला ते नाशिक प्रवासासाठी 190 रुपये भाडे आकारले जात आहे. दरम्यान, बसस्थानके आणि बसमधील स्वच्छता राखण्यासाठी 15 एप्रिलपासून आकारण्यात येणारा दोन रुपयांचा अधिभार आता मूळ तिकीटदरातच समाविष्ट केला आहे. एसटी प्रशासनाने स्टेजनिहाय तिकीटदर निश्चित करताना प्रवाशांना सोयीचे गणित ठेवले आहे. नियमानुसार एखाद्या मार्गाचे भाडे 22 रुपये होत असल्यास प्रत्यक्षात 20 रुपये आकारले जातील, तर 23 रुपये भाडे होत असल्यास 25 रुपये आकारले जात आहे. अशा प्रकारे सर्व तिकीटदर पाच रुपयांच्या पटीत निश्चित केले आहेत. मात्र, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत शंभर टक्के प्रवास सवलत मिळणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना दोन रुपयांचा स्वच्छता अधिभार स्वतंत्रपणे भरावा लागणार असल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.

नव्या तिकीट पद्धतीमुळे सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद, प्रवाशांचा वेळेचा अपव्यय आणि वाहकांवरील ताण कमी होईल, अशी अपेक्षा एसटी प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. निफाड, लासलगाव, येवला आणि नाशिक परिसरातील हजारो नियमित प्रवाशांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार असून, एसटीच्या प्रवासात अधिक सुलभता आणि शिस्त येण्यास मदत होणार आहे. – प्रशांत गुंड, आगार व्यवस्थापक

The hassle of small change during ST travel is over.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

18 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

18 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

18 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

18 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

18 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

18 hours ago