खरात आता मानसिकद़ृष्ट्या खचला
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधील चर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग आला असतानाच, सततच्या चौकशीमुळे खरात आता मानसिकद़ृष्ट्या खचला असून, आपण आता येथून बाहेर पडू शकत नाही, असे वक्तव्य त्याने केल्याचे माध्यमांमध्ये झळकले आहे.
अशोक खरातला अटक झाल्यापासून त्याच्याविरोधात एकामागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत. एका प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोच दुसर्या प्रकरणात त्याला सामोरे जावे लागत आहे. सध्या एसआयटीकडून त्याची दररोज आठ ते दहा तास चौकशी होत असून, या प्रक्रियेमुळे त्याची मानसिक स्थिती ढासळल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात सुमारे 15 गुन्हे नोंदवण्यात आले असून, सध्या चौथ्या गुन्ह्याच्या तपासावर भर दिला जात आहे.
आर्थिक नाड्या आवळल्या
‘एसआयटी’ने अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या नावावरील बँक खाती गोठवत त्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. ईडीने केलेल्या तपासात दोन पोतेभर कागदपत्रे जमा केली आहेत. तसेच त्याची महागडी कारही ईडीने जप्त केली आहे. संशयास्पद व्यवहारांमुळे खरातच्या मालमत्तांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
खरात अधिकच कोंडीत सापडला
एकूणच, अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, त्याच्याविरोधातील पुरावे वाढत आहेत. एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासामुळे त्याच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. मानसिक तणाव आणि वाढते गुन्हे यामुळे खरात अधिकच कोंडीत सापडला आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
The investigation is over, the Torah has come down!