गावकर्यांनी दिला होता चोप
नाशिक : प्रतिनिधी
भोंदूबाबा अशोक खरात याच्या वाईट कृत्यांची यादी दिवसागणिक मोठी होत आहे. आता अनेक महिलांनी अशोक खरातवर गंभीर आरोप केले आहेत. पण, वयाच्या 20 व्या वर्षीच खरातने नातेवाईक महिलेसोबत नको ते कृत्य केलं होतं. खरातचं 46 वर्षे जुनं प्रकरणदेखील आता समोर आले आहे. 1980 मध्ये भोंदूबाबाने कुटुंबातील महिलेचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर तो गावातून फरार झाला. कोपरगाव तालुक्यात त्याने एका महिलेला जादूटोण्याच्या जाळ्यात ओढलं. ही महिला त्याची दूरची नातेवाईक होती. महिलेला मूल होत नव्हतं अशात खरातने तावीज व विधींच्या नावाखाली तिचा गैरफायदा घेतला आणि तिचं लैंगिक शोषण केले होते, असे सांगितले जाते. गावाला खरातचे हे कांड कळल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला मारलेदेखील होते. अशात घाबरलेल्या अवस्थेत खरात याने एका रात्रीत गाव सोडले होते. त्यानंतर तब्बल 15 वर्षे तो कुठे होता, कोणत्या संरक्षणात होता आणि काय करत होता हे एक मोठे रहस्य आहे.
The Kharat scandal at the age of twenty
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…
सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्यांचे…
नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…
गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…
आज 20 मे, जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिकापालन…
सिन्नर-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर सुरू झालेली चर्चा थांबलेली…