महिलेला साडेसात लाखांचा गंडा
नाशिक : प्रतिनिधी
आजार बरा करण्यासह दैवी शक्तींनी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून पनवेल येथील एका महिलेकडून साडेसात लाख रुपये घेतल्याप्रकरणी नाशिकमधील अरुण धोंडू पाटील याच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायदा व भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पाठपुराव्यानंतर ही कारवाई झाली.
अस्थमाने त्रस्त असलेल्या या महिलेला आजार बरा करण्याचे आश्वासन देऊन संशयिताने पूजाविधी केले. त्यानंतर पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलेला अर्धनग्न अवस्थेत बसवून अघोरी पूजा केल्याचा आरोप आहे.
या विधीसाठी मानवी कवटी, विविध पूजासाहित्य आणि बोकडाच्या बळीचा वापर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तीन पूजाविधींच्या नावाखाली एकूण साडेसात लाख रुपये घेतल्यानंतरही आजार बरा झाला नाही किंवा पैशांचा पाऊस पडला नाही. पैसे परत मागितल्यानंतर टाळाटाळ करण्यात आली.
यानंतर ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कामी ‘अंनिस’चे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्तरी, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे, कोमल वर्दे आणि डॉ. मंगेश कादे यांनी प्रयत्न केले. अशा प्रकारे फसवणूक झालेल्यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिस व अंनिसने केले आहे.
The lure of making money rain
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…