नाशिक

नाशिकमध्ये आता ‘राष्ट्र प्रथम’चा संदेश

शहरात ठिकठिकाणी झळकले होर्डिंग्ज

नाशिक : प्रतिनिधी
दिल्लीतील जंतरमंतर येथील आंदोलनामध्ये काही अपप्रवृत्तीने विद्यार्थी तसेच हे एकूणच भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला आता नाशिकमधून होर्डिंगद्वारे उत्तर देण्यात आले आहे. ‘वी सपोर्ट नेशन’ या टॅगलाइनखाली राष्ट्र प्रथम असा संदेश दिल्याची बाब चर्चेचा विषय ठरले आहे.
अलीकडेच नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतरमंतर येथे मोठे विद्यार्थी आंदोलन झाले. युवाशक्तीची दखल घेत केंद्र शासनाने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामादेखील घेतला. या आंदोलनादरम्यान काही वक्तव्यांमधून पंतप्रधान, भारतीय लष्कर, पोलीस तसेच इतर राष्ट्रीय संस्थांबाबत अवमानकारक भाषा वापरण्यात आल्याचा आरोप काही घटकांकडून करण्यात आला होता. त्यामध्ये काही विरोधी पक्षांचा समावेश असल्याचीदेखील बाब पुढे आली होती. या प्रकारातून प्रामुख्याने देशातील झेन-जी अर्थातच युवावर्गाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता. नाशिकमध्ये कँडल मार्चद्वारे निघालेल्या समर्थन मोर्चामध्येदेखील काही अपप्रवृत्तींनी देशातील तरुणांना बदनाम करण्याचा प्रकार केल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर देशाच्या संस्था, सुरक्षा दल, विद्यार्थी आणि हिंदू देवतांप्रति समर्थन व्यक्त करण्यासाठी शहरातील प्रमुख चौक तसेच सिग्नलवर आता होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या होर्डिंग्जवर नेशन फर्स्ट अर्थातच राष्ट्र प्रथम, असा संदेशही ठळकपणे देण्यात आला आहे. देशाची एकता, राष्ट्रीय संस्था, जवान, पोलीस, विद्यार्थी आणि सांस्कृतिक श्रद्धास्थानांबाबत सकारात्मक भूमिका मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वी सपोर्ट पीएम, वी सपोर्ट आर्मी, यूथ, पोलीस अशाही घोषणा आहेत.
दरम्यान, या होर्डिंग्जची नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, सोशल मीडियावरही त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

The message of ‘Nation First’ now in Nashik.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

4 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

4 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

4 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

4 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

4 days ago