खूप खूप पाऊस झाला, म्हणून कावळ्याचे घर वाहून गेले. हा कावळा आळशी कावळा नव्हता. याने फार मेहनतीने स्वतःसाठी छान घरटे बांधले होते. शेणाचे नाही तर अगदी पक्के आणि आपल्या त्या घरट्यात तो अनेक पक्ष्यांंना आसराही देई. अगदी चिमणीला व तिच्या बाळालाही त्याने आसरा दिलेला होता. पण निसर्ग कोपला आणि कावळ्याचे घरटे तुटले. पावसाचा जोर काही थांबेना. एका मोठ्या घराच्या आडोशाला कावळा थांबला. पण पावसाच्या वाढत्या जोरामुळे कावळ्याला आडोशालाही थांबता येईना. बिचारा! त्याने विचार केला, चला समोरचं तर चिऊताईचं घर दिसतंय! थोडा वेळ घेऊया तेथे आसरा.
तो आला चिऊताईच्या घरापुढे म्हणाला, चिऊ चिऊ ताई दार उघड! चिमणीने आवाज ऐकला. तिला जरा वैतागच आला. हा कशाला आला असेन बरं आता, असा विचार ती करू लागली. थंडीने कुडकुडणार्या कावळोबा पुन्हा आवाज दिला. अगं चिऊताई, दार उघड.
आता मात्र चिऊताई, एक एक कारण पुढे करु लागली, थांब माझ्या बाळाला, आंघोळ घालू दे, थांब माझ्या बाळाला कपडे घालू दे. कावळा बिचारा थांबला. पुन्हा थोड्या वेळाने त्याने चिमणीला मदतीसाठी साद घातली.
चिमणी उत्तरली, थांब हं माझ्या बाळाला खाऊ घालूदे. थांब हं माझ्या बाळाला गंध पावडर लावू दे, थांब माझ्या बाळाला अंगाई म्हणू दे.अशी अनेक कारणे देत चिऊताई वेळ काढत होती.
बाहेर कावळेदादा मात्र थंडीत कुडकुडत अगदी केवीलवाणे झाले होते. शेवटी, वैतागलेला कावळेदादा कुठलाही राग मनात न ठेवता दुसरीकडे आसरा शोधायला निघून गेले. नक्कीच त्यांना दुसरा आसरा मिळालाच असेन.
प्रसंग काल्पनिक असला तरीदेखील असे अनुभव आपल्यालाही येतातच. अनेकदा अडचणीच्या वेळी भरवशाच्या व्यक्तींकडून वाईट अनुभव मिळतो. अनेकदा आपण एकटे पडतो. किंवा आपण कितीही सरळमार्गी असलो तरी, मानहानीचे अनेक प्रसंग, उदास करणारे अनेक प्रसंग हे उद्भवतातच. अशावेळी कच खाऊन पळ काढायची, वाद घालत बसायचे, मनस्ताप करत स्वतःला दोष देत बसायचे की, दुर्लक्ष करत स्वतः समजावत पुढे जायचे, या निर्णयावर आपली पुढील मनस्थिती अवलंबून असते. आणि असे निर्णायक क्षण हे अगदी रोजही येऊ शकता.क्षणाक्षणाला परिक्षा घेऊ शकतात. म्हणजेच काय की,
स्वतःला घडविण्याची संधीदेखील रोजच मिळते असेच मी म्हणेन.
अशा रोज मिळणार्या संधीचे रोजच स्वागत करण्यासाठी रोजच स्वतःला नव्या दमाने तयार करायला हवे. स्वतःवरचा विश्वास वाढवायला हवा. नवीन वर्षाची चाहूल लागलीच आहै. जुन्या वर्षाचे बोटावर मोजण्याइतके दिवस राहिले आहेत. याकडेही एक संधी म्हणूनच बघायला हवं. स्वतःला मानसिक दृष्टीने ही कणखर बनवायला हव आहे.
लहानसहान प्रसंगांनी खचून जात, आत्महत्येसारखं अगदी टोकाचं पाऊन उचलणार्या अनेक घटना सतत येतात कानावर. छोट्या-छोट्या गोष्टींचा राग डोक्यात ठेवत एखाद्याचा जगण्याचा अधिकार हिरावून घेण्याइतका राग व पशुवृत्ती उफाळून येते. खूप लहानसहान गोष्टी सतत मनाला लावून घेत स्वतःचेच खच्चीकरण केले जाते. समजून घेण्यातच आपण कमी पडतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण होते.
कठीण नक्कीच असते ही परिस्थितीपण अशक्य मात्र नसते.
उगाचच कुणाचे दिखाऊ स्टेटस बघून
स्वतःमधील कमतरता शोधत बसायला नको. फिल्टर वापरलेलं आयुष्य कितीही सुंदर दिसत असलं तरी मृगजळ असू शकते. दिखाऊ आयुष्यापेक्षा वास्तव आयुष्य जगण्याचा संकल्प करूया. भले ते थोडे साधारण असेन, इतरांच्या मानाने कुरूपही वाटेल, पण ते खरे असेन याचे समाधान फार मोठे असणार. आणि दिखाऊ सुंदरतेच्या मागे धावणारांना कदाचित कुरूपतेत लपलेले रुबाबदार राजहंसपण नक्कीच कधीतरी दिसू शकते. नाहीच दिसले तरी हा ज्याच्या त्याच्या विचारांचा प्रश्न आहे. आपण मात्र वास्तव स्वीकारून आपल्यातील राजहंस शोधायला हवा. कोण काय आणि कसं वागतोय यापेक्षा आपल्या वागण्यात खरेपणा जपण्यावर भर दिला तर फार मोठे यश, मानसिक समाधान आपण प्राप्त करू शकतो.
चला तर मग येणार्या नव्या वर्षात इतर काही संकल्प करा अथवा नका करू, पण
स्वतःला पुन्हा नव्याने घडविण्याची कला साध्य करूया आणि आपलेच आयुष्य वास्तववादी सुंदर बनवूया. येणार्या नवीन वर्षाच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
– मनीषा चौधरी
The opportunity should be welcomed.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…