फाळके स्मारक पुढील आठवड्यापासून खुले होणार डागडुजीची कामे अंतिम टप्प्यात

 

नाशिक : प्रतिनिधी
नाशिककर आणि पर्यटकांचे नेहमीच लक्ष वेधून घेणारे फाळके स्मारक गत अडीच वर्षांपासून बंद आहे . कोरोना महामारीमुळे निर्बंध लागू झाल्याने हे उद्यान बंद करण्यात आले होते . त्यानंतर शासनाने निर्बंधांमध्ये संपुर्ण शिथिलता आणल्यानंतरही हे स्मारक बंद आहे . दरम्यान पुढील आठवडयापासून म्हणजे सोमवार ( दि . २० ) पासून हे स्मारक नाशिकरांसाठी खुले करण्यात येणार आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नाशिक शहरातील विविध सभागृह , तसेच जिल्हयातील अभयारण्य यापूर्वीच खूली करण्यात आली . परंतु फाळके स्मारक अद्यापपर्यंत खुले करण्यात आलेलेच नसल्याने या स्मारकाला खुलण्यास मूहर्त कधी लागेल असा सवाल नाशिककरांकडून केला जात होता . पालिका आयुक्त रमेश पवार यांनी काही दिवसांपूर्वी या स्मारकाची पाहणी करत तेथे विविध कामे करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या . त्यानंतर पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी वेळोवेळी स्मारकाची पाहणी केली . स्मारकात प्रवेशासाठी पूर्वीच्या दराप्रमाणेच तीकिटासाठी पैसे मोजावे लागणार आहे . उद्यान खुले करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून वारंवार सांगण्यात येत असले तरी उद्यान मात्र खुले झालेले नाही . त्यामुळे आता २० जूनला तरी उद्यान खुले होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . मागील अडीच वर्षांपासून महापालिकेचे फाळके उद्यान बंद आहे . पालिकेने आता ते खूले करण्याचा निर्णय घेतल्याने या पार्श्वभूमीवर येथील डागडुजीची कामे केली जात असून ती अंतिम टप्यात आहे . स्मारक खुले करण्यापूर्वी मनपा आयुक्त रमेश पवार हे स्वत : उद्यानाची पाहणी करणार आहे .

येथील पांडव लेणी आणि फाळके उद्यान नाशिककरांबरोबर पर्यटकांना आर्कषित करते . बाहेरून आलेले पर्यटक या ठिकाणाला आर्वजून भेट देतात . मात्र , अडीच वर्षांपासून हे उद्यान बंद असल्याने ते कधी सुरू होणार असा प्रश्न नाशिककरांकडून वारंवार विचारला जात आहे . त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील कारंजा व इतर छोटी – मोठी कामे पुर्ण करून पुढील आठवड्यापासून उद्यान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago