नाशिक

रिक्षाचालकांच्या आंदोलनाने नाशिककरांचे हाल

ओला, उबर आणि रॅपिडो कंपन्यांची संधीचा फायदा उठवत भाडेवाढ

नाशिक : प्रतिनिधी
अनधिकृत बाइक टॅक्सी आणि स्क्रॅप रिक्षांवरील कारवाईसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहरातील रिक्षा संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाचा मोठा फटका सोमवारी (दि.23) सर्वसामान्य नाशिककरांना बसला.रिक्षा बंदमुळे दिवसभर कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, महिला आणि महत्त्वाच्या आरोग्य किंवा इतर कामांसाठी जाणार्‍या प्रवाशांचे इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी शहर बस व खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
शहरात गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोणत्याही सरकारी परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाइक टॅक्सी आणि कालबाह्य (स्क्रॅप) रिक्षांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी नाशिकमधील सर्व रिक्षा संघटनांनी एकत्र येत कृती समितीच्या माध्यमातून धरणे आंदोलन सोमवारी केले. परिणामी नाशिककरांना प्रवास करण्यास मोठी कसरत करावी लागली. या संपाचा फायदा उठवत रॅपिडो, ओला व उबर यांसारख्या प्रवासी वाहतूक करणार्‍या कंपन्यांनी आपल्या सेवेत दरवाढ करीत नाशिककरांना वेठीस धरले.
दिवसभर रिक्षा बंद ठेवण्यात आल्याने रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, बाजारपेठा व रुग्णालयांत तसेच शाळा, महाविद्यालयांत जाणार्‍या विद्यार्थी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेक प्रवाशांना तासन्तास बसची वाट पाहावी लागली, तर काहींना पायी प्रवास करावा लागला.
ओला, उबर व रॅपिडो कंपन्यांनी या संधीचा फायदा उठवत भाडेवाढ केल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंडासह मनस्तापात भर पडली. ज्या ठिकाणी 50 ते 70 रुपये प्रवासी भाडे यापूर्वी होते त्याच ठिकाणी पोहोचण्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये भाडे आकारण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेषतः विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला.

आम्ही साडेतीन लाखांची रिक्षा घेऊन, सरकारचे सर्व कर व विमा भरून प्रामाणिकपणे व्यवसाय करतो. मात्र, कोणतीही परवानगी नसताना गेल्या अडीच वर्षांपासून शहरात बेकायदेशीर बाइक टॅक्सी चालवून आमच्या पोटावर पाय दिला जात आहे. आरटीओ प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आता जिल्हाधिकार्‍यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, यानंतरही ठोस कारवाई झाली नाही, तर नाशिकमधील सर्व रिक्षाचालक बेमुदत रिक्षा बंद आंदोलन पुकारतील.
– भगवान पाठक, पदाधिकारी, रिक्षा युनियन कृती समिती, नाशिक

पोलीस आयुक्तांना अधिकार देऊन संबंधित कंपन्यांचे अ‍ॅप आणि बाइक टॅक्सी बंद करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. वाढलेल्या 21 हजार रिक्षा, परमिटनुसार नवीन रिक्षा स्टँड देण्याचे आणि आरटीओ कमिटीच्या बैठकीत युनियनच्या चार पदाधिकार्‍यांना समाविष्ट करण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले आहे. प्रशासनाने दिलेल्या शब्दानुसार जर बाइक टॅक्सी आणि त्यांचे अ‍ॅप बंद झाले नाही, तर येत्या 15 ते 20 दिवसांत सर्व युनियनतर्फे आणखी मोठा मोर्चा काढण्यात येईल.
– सुनील बागूल, अध्यक्ष, श्रमिक सेना

The plight of Nashik residents due to the rickshaw pullers’ protest

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कांद्याचा का होतो नेहमीच वांधा?

- आनंदा जाधव भल्याभल्यांना घाम फोडणारा आणि प्रसंगी केंद्रातील सत्तासमीकरणेही बदलणारा कांदा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी…

7 minutes ago

ये तो होना ही था!

- देवयानी सोनार पार्टी वुईथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अलीकडच्या काळात पक्षशिस्तीचे…

12 minutes ago

1972 ते 2026 : दुष्काळ बदलला, पण प्रश्न तेच

- किशोर जाधव ज्या पिढीने 1972 चा दुष्काळ अनुभवला, ती पिढी आता साठीच्या पुढे आहे.…

19 minutes ago

मदतीची शिक्षा!

- अशोक थोरात समाजात प्रामाणिकपणा उरला आहे की नाही, अशी शंका येणार्‍या अनेक घटना सातत्याने…

25 minutes ago

गुरू नानक : समता, सेवा आणि मानवतेचा प्रकाश

नवी संस्कृतीच्या इतिहासात काही महापुरुषांनी आपल्या विचारांनी, कार्याने आणि जीवनमूल्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी…

32 minutes ago

धर्मनिरपेक्ष भगवी वाट

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग…

35 minutes ago