सिडको : विशेष प्रतिनिधी
अनादि काळापासून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांंच्या पालखीचा दुसरा मुक्काम बुधवारी (दि. 11 जून) सातपूर गावात मोठ्या उत्साहात झाला. त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान केलेल्या या पालखीचे स्वागत करण्यासाठी सातपूर ग्रामस्थांनी एक महिना आधीच तयारी सुरू केली होती. नाशिक पंचायत समितीच्या प्रांगणात आज (दि. 12) सकाळी नऊ वाजता नाशिककरांच्या वतीने नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर सातपूरमध्ये पालखी स्वागत समितीची स्थापना करण्यात आली होती. यात अध्यक्ष नीलेश भंदुरे, कार्याध्यक्ष सुनील मौले, नितीन निगळ, गोकुळ निगळ, विजय भंदुरे, शांताराम निगळ, अमर काळे, माजी नगरसेविका सीमा निगळ, तुकाराम बंदावणे यांच्यासह ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग होता. वारकर्यांची गैरसोय होऊ नये यासाठी संपूर्ण गावकर्यांनी पुढाकार घेतला होता. स्वागतापासून भोजन, निवास, स्नान, शौचालये, पिण्याचे पाणी, चहा-नाश्ता अशा सर्व व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आल्या. बुधवारी सकाळी पपया नर्सरी ते सातपूर गावादरम्यान बँडपथकासह स्वागतयात्रा काढण्यात आली.
पालखी आणि सातपूर यांचे 150 वर्षांचे नाते
संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचा पहिला मुक्काम जवळपास 150 वर्षांपासून सातपूर गावात होत आहे. यामुळे सातपूर ग्रामस्थांसाठी ही परंपरा अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद आहे.
पहिल्यांदाच जनता विद्यालय आणि भाजी मंडईचा समावेश
यंदा दिंडीच्या स्वागतासाठी विशेष बाब म्हणजे, जनता विद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज भाजीमंडई यांचा प्रथमच स्वागत व्यवस्थेत समावेश करण्यात आला होता. पावसाचा अंदाज लक्षात घेता जनता विद्यालयात वाहन पार्किंगची, तर भाजी मंडईत वारकर्यांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.
पुरुषोत्तम नाईक मेष : अडचणी वाढतील या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची…
बालाजी सोशल फाउंडेशनतर्फे भव्य देखावा उभारणीला सुरुवात नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी दरवर्षी अप्रतिम देखाव्यांसाठी ओळखल्या…
मनमाडला अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात मनमाड : प्रतिनिधी भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग…
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय मेशी : वार्ताहर खडकतळे येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नववीतील विद्यार्थिनी…
मंत्री सामंतांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आज आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य…
दुपारपासूनच फेरीला सुरुवात; ब्रह्मगिरीवर भक्तांची गर्दी त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या तिसर्या सोमवारच्या ब्रह्मगिरी…