सख्खा भाऊ पक्का वैरी, सातपूर खुनाच्या घटनेने हादरले

नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरुच

सातपूर  येथे भावाने केला भावाचा  खून

सिडको : दिलीपराज सोनार

-सातपूर औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या संतोषीमाता नगर परिसरातघरगुती वादातून सख्या भावाने धारदार हत्याराने वार करत खून केल्याची घटना घडली. करण शिंगाडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याचा भाऊ अर्जुन शिंगाडे याला ताब्यात घेतले आहे.. माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. .या घटनेनंतर संतोषीमाता नगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे, क्राईम पी.आय. विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय निहालदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप, पोलीस कॉन्स्टेबल राकेश रसाळ, सागर गुंजाळ व हवालदार विश्वास पाटील आदी सातपूर पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago