नाशिक

स्टेशनवर फायरिंग करून फरार झालेल्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

नाशिकरोड गुन्हे शोध पथक अन् युनिट 2 ची धडक कारवाई

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
रेल्वे स्टेशन परिसरात पिस्टलचा धाक दाखवून लूटमार करणे आणि उपनगर हद्दीत फायरिंग करून दहशत माजवून फरार झालेल्या दोन अट्टल आरोपींना गजाआड करण्यात नाशिकरोड गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाला यश आले आहे. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून, पोलिसांनी वेगवेगळ्या शहरांत शोधमोहीम राबवून ही कामगिरी केली.
पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी सहायक आयुक्त अद्विता शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गत 29 जुलै रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्टेशन समोरील बसस्थानकात भूषण गोसावी व त्याच्या साथीदारांनी अफरोज अख्तर खान यांच्या पोटाला पिस्टल लावून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांच्या खिशातील 17 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात व उपनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.
घटना गंभीर असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी तत्काळ तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक व युनिट 2 चे पथक रवाना करण्यात आले. पथकाने ओझर, दिंडोरी, तळेगाव-वणी, मनमाड, कन्नड, राहाता, शिर्डी अशा विविध ठिकाणी शोध घेतला. अखेर शिर्डी येथून रोहित पगारे (रा. श्रमिकनगर, शिर्डी) याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
दुसरीकडे, गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व पथकाने तांत्रिक विश्लेषण करून दुसरा आरोपी आयुष शिंदे याचा सुगावा लावला. आयुष शिंदे हा वेश बदलून जेलरोड परिसरात वावरत असल्याची गुप्त माहिती मिळताच, 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी दसक पेट्रोलपंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असताना त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी उपनिरीक्षक माळी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी (गुन्हे), पोलीस निरीक्षक घनदाट, गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी हेमंत तोडकर, सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक सुनील बिडकर, जितेंद्र माळी यांच्यासह विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, गोकुळ कासार, योगेश रानडे व महिला पोलीस शिपाई बहिरट यांच्या पथकाने केली.

The two individuals who fled after opening fire at the station have been apprehended.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

9 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

9 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

9 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

9 hours ago

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…

9 hours ago

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…

10 hours ago