नाशिक

भरधाव चारचाकीची दोन दुचाकी, कारला धडक; एक जखमी, चालक फरार

सातपूर : प्रतिनिधी
सातपूर परिसरातील अशोकनगर, सावरकरनगर बसस्टॉपजवळ बुधवारी (दि. 5) रात्री सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने दोन दुचाकी व एका चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण जखमी झाला असून, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पसार झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. नेहमीप्रमाणे सावरकरनगर बसस्टॉप परिसरात वाहतुकीची वर्दळ सुरू असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकीने प्रथम एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आणखी एका दुचाकीसह एका चारचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात एक जण जखमी झाला असून, स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे
फुटेज तपासण्यात येत असून, धडक देणार्‍या वाहनाचा व चालकाचा शोध सुरू आहे. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने हिट अँड रनच्या अनुषंगानेही तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, परिसरात काही वाहनचालकांकडून भरधाव वेगाने वाहने चालविली जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

Speeding car rams into two two-wheelers and another car; one injured, driver flees.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

13 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

13 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

14 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

14 hours ago

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…

14 hours ago

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…

14 hours ago