नाशिक

जुन्या वादातून दोघांवर कुर्‍हाड, दांडक्याने हल्ला

17 जणांसह 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मालेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील हिसवाळ येथे कुरापत काढून दोघा भावांवर कुर्‍हाड व लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी 17 जणांसह 25 ते 30 स्त्री-पुरुषांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जितेंद्र दिगंबर चव्हाण (वय 47, रा. हिसवाळ) व त्यांचे भाऊ भूपेंद्र चव्हाण हे गावातील गेट क्रमांक 2 जवळ असताना, जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्यावर हल्ला केला. संशयितांनी कुर्‍हाड तसेच लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी अमृत आनंदा सोनवणे (वय 39), बापू सोनवणे, सुनील सोनवणे, प्रताप माळी, भुरा सोनवणे, मुळचंद, शरद, रक्या, धाक्या, सुनील डान्सर, अमृत सोनवणे यांची पत्नी, त्यांची बहीण, हिरामण गायकवाड तसेच इतर 25 ते 30 स्त्री-पुरुष (सर्व रा. आदिवासी वस्ती, हिसवाळ) यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार भदाणे करीत आहेत.

Two attacked with an axe and a club over an old dispute.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

8 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

8 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

8 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

8 hours ago

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…

8 hours ago

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…

9 hours ago