शासनाच्या संवेदनशून्य कारभाराचा निषेध
नाशिक/त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
शासकीय रुग्णालयात बालकाचा मृत्यू झाल्यास मृतदेह घरी नेण्यासाठी मोफत शववाहिनी देण्याची तरतूद असतानाही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका दुर्दैवी माता-पित्याला आपल्या बाळाचा मृतदेह दुचाकीवरून पोटाशी धरून तब्बल 60 किलोमीटर अंतराचा प्रवास करण्याची अमानुष वेळ आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगाव (बर्ड्याची वाडी) येथील संगीता राहुल मेंगाळ या गर्भवती महिलेला 1 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे 2 वाजता त्यांनी बाळाला जन्म दिला. मात्र, सकाळी 11 वाजता उपचार सुरू असताना नवजात बालकाचा मृत्यू झाला. दुःखात असलेल्या माता-पित्यांनी मृतदेह घरी नेण्यासाठी शासकीय वाहनाची मागणी केली; परंतु रुग्णालयाकडून त्यांना थेट नकार देण्यात आला. गरीब परिस्थितीमुळे खासगी रुग्णवाहिकेचा खर्च करणे अशक्य असल्याने, अखेर त्या हतबल पालकांना पोटच्या गोळ्याचा मृतदेह मोटारसायकलवर ठेवून बालकाचे वडील, काका व आत्या यांनी नाशिक ते टाकेदेवगाव असा 60 किमीचा खडतर प्रवास करावा लागला. या धक्क्यामुळे बालकाच्या मातेची प्रकृती बिघडल्याने तिला पुन्हा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले आहे.
शासनाच्या या संवेदनशून्य कारभाराचा एल्गार कष्टकरी संघटनेने तीव्र शब्दात निषेध केला असून, त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचा आरोप केला आहे.
सर्वसामान्यांच्या सुविधा नाकारणार्या आणि माणुसकीला काळिमा फासणार्या संबंधित अधिकारी-कर्मचार्यांवर योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
-भगवान मधे, अध्यक्ष, एल्गार कष्टकरी संघटना महाराष्ट्रशासकीय योजना कागदावरच
भारत सरकारच्या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत एक वर्षापर्यंतच्या बालकांसाठी मोफत उपचारासह घर ते रुग्णालय आणि रुग्णालयातून घरी जाण्यासाठी मोफत वाहतुकीची सोय आहे. दुर्दैवाने मृत्यू झाल्यास मृतदेह सन्मानाने घरी नेण्यासाठी हर्स व्हॅन किंवा विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे बंधनकारक असतानाही या कुटुंबाला ही सुविधा नाकारण्यात आली.
The unfortunate situation of having to transport a child’s body on a two-wheeler.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…