आठ प्रकल्पांतून 24 हजार 125 रोजगाराची क्षमता
नाशिक : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या इन्व्हेस्ट महाराष्ट्र उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सामंजस्य करारांत नाशिक जिल्ह्यासाठी 57 हजार 120 कोटींच्या प्रस्तावित गुंतवणुकीचे आठ प्रकल्प समोर आले आहेत. यापूर्वीच्या 35 हजार कोटींंच्या गुंतवणुकीव्यतिरिक्त हे प्रस्ताव आहेत. संबंधित प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास सुमारे 24 हजार 125 रोजगार निर्मितीची क्षमता निर्माण होण्याची शक्यता आहे.
सेमीकंडक्टर, डेटा सेंटर, माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस व संरक्षण, रसायने आणि पुनर्वापर अशा आधुनिक व उच्च तंत्रज्ञानाधारित क्षेत्रांत हे प्रकल्प प्रस्तावित आहेत. नाशिक शहरासह चांदवड व दिंडोरी भागातही प्रकल्प प्रस्तावित असल्याने औद्योगिक विकासाचा विस्तार जिल्ह्याच्या विविध भागांत होण्याची शक्यता आहे. 57 हजार 120 कोटींची ही रक्कम सध्या प्रत्यक्ष झालेली गुंतवणूक नसून, सामंजस्य करारांमधून व्यक्त झालेली प्रस्तावित गुंतवणूक आहे. आवश्यक परवानग्या, पायाभूत सुविधा आणि अन्य प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच
या प्रकल्पांची प्रत्यक्ष उभारणी होणार आहे. त्यामुळे प्रस्तावांचे प्रत्यक्ष प्रकल्पांत रूपांतर आणि त्यातून अपेक्षित रोजगारनिर्मिती हा पुढील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या प्रस्तावित गुंतवणुकीचे प्रत्यक्ष प्रकल्पांत रूपांतर झाल्यास रोजगार निर्मितीसोबतच पूरक उद्योग, सेवा क्षेत्र आणि स्थानिक पुरवठा साखळीला चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामंजस्य करारानंतर प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा वेग महत्त्वाचा ठरणार आहे.
नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी ही महत्त्वाची संधी आहे. पारंपरिक उत्पादन केंद्रासोबतच उच्च तंत्रज्ञानाधारित आणि विविधांगी औद्योगिक केंद्र म्हणून नाशिक विकसित होण्याची ही संधी आहे. प्रस्तावित गुंतवणुकीचे प्रत्यक्ष प्रकल्पांत रूपांतर करण्यासाठी उद्योग, शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी निमा कटिबद्ध आहे. – आशिष नहार, अध्यक्ष, निमा
सेमीकंडक्टर, डेटा सेंटर, माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस व संरक्षण, रसायने आणि पुनर्वापर अशा आधुनिक क्षेत्रांतील प्रकल्पांमुळे नाशिकच्या औद्योगिक वाटचालीला नवी दिशा मिळू शकते. नाशिकसह चांदवड व दिंडोरीतही प्रकल्प प्रस्तावित असल्याने औद्योगिक विकासाचा विस्तार जिल्ह्याच्या विविध भागांत होण्याची शक्यता आहे. नाशिकला औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी आयमा प्रयत्नशील आहे. – राजेंद्र पानसरे, अध्यक्ष, आयमा
Investment proposals worth ₹57,000 crore for the district.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…