राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर घणाघात
इंदूर : प्रतिनिधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित ’छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थिनीने शिक्षणासाठी शहरात राहणार्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची आणि वाढत्या खर्चाची गंभीर समस्या मांडली. वाढते भाडे, सरकारी वसतिगृहांमधील अपुर्या जागा आणि महागाई यामुळे सामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करताना मोठा आर्थिक संघर्ष करावा लागत असल्याकडे तिने राहुल गांधींचे लक्ष वेधले.
विद्यार्थिनीच्या या समस्येचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. सरकारकडे दिवे लावण्यासाठी आणि उत्सवांसाठी भरपूर पैसा आहे, पण देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी आणि शिक्षणासाठी सरकारकडे पैसा का नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर भाष्य करताना राहुल गांधी यांनी सरकारी व्यवस्थेवर (सिस्टीम) जोरदार प्रहार केला. सध्याच्या सिस्टीमला प्रश्न विचारणारे आणि हक्कासाठी लढणारे विद्यार्थी नकोत, तर त्यांना केवळ ’अंधभक्त’ हवे आहेत, असा घणाघात त्यांनी केला. हा कार्यक्रम म्हणजे देशभरातील विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुणाचेही शिक्षण थांबू नये
शिक्षण हा विद्यार्थ्यांवर केलेला कोणताही उपकार नसून तो त्यांचा हक्क आहे, त्यामुळे आर्थिक परिस्थितीअभावी कुणाचेही शिक्षण थांबू नये यासाठी सरकारने योग्य त्या सुविधा पुरवल्या पाहिजेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. या कार्यक्रमात वसतिगृहाच्या प्रश्नासोबतच एमपीपीएससी भरती प्रक्रियेतील विलंब, पेपरफुटी, रखडलेल्या नियुक्त्या आणि शिष्यवृत्तीत झालेली कपात यांसारखे ज्वलंत मुद्देही विद्यार्थ्यांनी उपस्थित केले.
There is money to light lamps, but not for hostels?
- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…
- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…
- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…
आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…