नाशिक

पेट्रोल-डिझेल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

आठपैकी पाच संशयित आरोपींना महिनाभरानंतर अटक

मनमाड : प्रतिनिधी
मनमाड शहरातील भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई-मनमाड-बिजवासन या पेट्रोलियम पाइपलाइनला छिद्र पाडून त्यातून थेट नळकनेक्शन करून पेट्रोल-डिझेलची चोरी करणार्‍या या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मनमाड शहर नजीक असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या अनकवाडे शिवारात मुंबई-मनमाड-बिजवासन पाइपलाइनला छिद्र पाडून पेट्रोल डिझेलची चोरी सुरू असल्याचे 6 मे रोजी उघडकीस आले होते. याप्रकरणी बी.पी.सी. एल. इन्टॉलेशन पानेवाडी येथील प्रबंधक अनुज धर्मराव यांच्या तक्रारीवरुन मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सुनील ऊर्फ सोनू जयशंकर तिवारी (वय 35, रा. कल्याण) कथुरायन ऊर्फ कार्तिक रामकृष्ण मुदलियार (वय 38, रा. गोवंडी, मुंबई) यांना अनकवाडे शिवारात एका पोल्ट्री फॉर्मजवळ शिताफीने ताब्यात घेतले. अधिक तपासात त्यानी मोहम्मद मकसूद अब्दुल वाहीद शेख (वय 40, गोवंडी मुंबई) इरफान याकुब मोमीन (रा. मनमाड), काकासाहेब शिवराम गरुड (रा. अनकवाडे) यांना मनमाड येथून ताब्यात घेतले.
या गुन्हातील वाहीद सदार सय्यद, (रा. गोवंडी, मुंबई), याकुब शेख, अमजद कुरेशी, (रा. मुंबई) यांची नांवे निष्पन्न झाली आहेत. या गुन्ह्यात आतापर्यंत आठ आरोपी निष्पन्न झाले असून, पाच आरोपीना अटक करण्यात आली आहे.

कंपनीतून कोणाची मदत?

भारत पेट्रोलियम कंपनीला मुंबईवरून पेट्रोलियम पाइपलाइनद्वारे इंधनपुरवठा होतो. ही पाइपलाइन अतिशय संवेदनशील असल्याने तिच्यावर ऑनलाइन नियंत्रण ठेवले जाते. विशेष म्हणजे, कंपनीच्या आतून एक थेंब इंधन चोरीला गेले किंवा वाया गेले तर अलार्म वाजतो. जीपीएसद्वारे लिकेज ठिकाण कळते. मग हा चोरीचा प्रकार घडत असताना कोणत्याही प्रकारचा अलार्म वाजला नाही का? किंवा या सर्व प्रक्रियेत कंपनीच्या आतून मदत होती का?
अधिकारी वर्गाच्या मदतीशिवाय ही चोरी शक्य नाही, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago