पारंपरिक खण पैठणी सजावटीला ग्राहकांची वाढती पसंती
नाशिक : प्रतिनिधी
दीपावली म्हणजे दिव्यांचा लखलखाट, मांगल्याचे वातावरण आणि अंगणातल्या रांगोळीसोबत नात्यांची उजळलेली वीण. सणांचा राजा म्हणता येईल अशा दिवाळी सणासाठी सारे सज्ज होत असून, घरातील साफसफाईनंतर वेध लागले आहे ते घर सजावटीचे. दिवाळी सणासाठी नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी घरी सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश देत एकमेकांना भेटवस्तू देतात. भेटवस्तू देण्यासाठी, घरगुती वापरासाठी, सणानिमित्त घर सजविण्यासाठी यंदा घराघरांतून चिनी आणि प्लास्टिकच्या झगमगाटाला फाटा देऊन अस्सल महाराष्ट्रीयन परंपरेला पसंती दिली जात आहे.
दिवाळीच्या या उत्सवाच्या वातावरणात खण आणि पैठणीच्या गृहसजावटीच्या साहित्याने बाजारात वेगळीच छाप पाडली असून, ग्राहकांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
यंदाच्या सणात पर्यावरणपूरक आणि हाताने बनविलेल्या वस्तूंना नागरिक मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देत आहेत. पैठणी आकाशकंदील, औक्षणाची पैठणी व खणाचे ताट, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात येणारे सुबक तोरण यांना महिलावर्गाकडून मोठी मागणी आहे. कमीत कमी दरात घराला राजेशाही लूक सणाच्या निमित्ताने बैठकीच्या खोलीला राजेशाही रूप देण्यासाठी खास डिझाइन केलेले कुशन कव्हर्स, डायनिंग टेबल रनर आणि आकर्षक लटकन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.
लक्ष्मीपूजन व पाडव्याच्या मंगल क्षणांसाठी वेलवेट आसन उपलब्ध करून देण्यात आले आहे. उच्च दर्जाचे कापड आणि बारीक कलाकुसर असूनही हे सर्व साहित्य सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
यंदा प्लास्टिक दिखाऊ वस्तूंऐवजी आम्ही परंपराची पैठणी कुशन कव्हर्स आणि तोरण खरेदी केले आहे. या साहित्यामुळे घराला राजेशाही लूक आला आहे.
– जयश्री शिंदेग्राहकांना सणानिमित्ताने घरसजावटीचे आकर्षक पर्याय माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे मागणी वाढली असून, तोरण, खणाचे पैठणीचे आकाशकंदील औक्षणाचे ताट यांना विशेष पसंती मिळत असून, परदेशातही मागणी असल्याने दोन महिन्यांपूर्वीच परदेशात साहित्य विक्री केली आहे.
– वृषाली माहेगावकर, संचालक, कला द डिझायनर (परंपरा ब्रॅण्ड)
असे आहेत दर
औक्षणाचे पैठणी खण ताट : 400 रुपये
तोरण : 350 रुपये
पैठणी आकाशकंदील : 300 प्रति पॅकेट रूपये
पैठणी कुशन कव्हर्स : 200 प्रति नग रुपये
वेलवेट आसन : 150 रुपये
टेबर रनर आणि लटकन माफक दरात उपलब्ध
This Diwali will feature an authentic, traditional Marathi-style celebration.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने विकत घेण्याचा प्रघात पूर्वापार चालत आला आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून सोन्याचे भाव…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे दोघेही पुराणमतवादी आणि उजव्या विचारसरणीचे…
नाशिक : विशेष प्रतिनिधी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भुसावळ विभागाने प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान स्फोटक, ज्वलनशील किंवा…
दहिवाळ, दरेगाव परिसरात वनविभागाची कारवाई मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव वनपरिक्षेत्रात अवैध लाकूड वाहतुकीविरोधात वनविभागाने कारवाई…
कैद्यांना विक्रीसाठी आणल्याचा संशय; गुप्तांगाजवळ अंडरपॅन्टमध्ये टेपने गुंडाळून ठेवला होता अमली पदार्थ नाशिकरोड : विशेष…
सातपूरमधील कार्बन नाका परिसरातील घटना सिडको : प्रतिनिधी दारू पिण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पाच जणांनी…