पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

माजी नगरसेविकेचा पुढाकार, तत्काळ दुरुस्ती

पंचवटी : प्रतिनिधी
पंचवटी विभागात बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. यातच हिरावाडीतील त्रिकोणी बंगल्या जवळ पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन लिकेज् होऊन हजारो लिटर पाणी वाया गेले होते. मात्र, माजी नगरसेविका प्रियांका माने पुढाकार घेत पाणीपुरवठा विभागास संपर्क साधून तत्काळ दुरुस्ती करून घेतली. हिरावाडी, त्रिमूर्तीनगर, तांबोळीनगर, कमलनगर, गणेशवाडी, शेरे मळा, कृष्णनगर, टकलेनगर व तपोवनातील काही भाग अशा बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. यात काही भागात पाणी बाणी असते तर काही भागात कमी दाबाने पाणी अशी आहे. सोमवारी (ता.13) त्रिकोणी बंगल्याजवळ पिण्याची पाइपलाइन लिकेज् झाली होती. याठिकाणी हजारो लिटर पाणी वाया गेले. ही माहिती परिसरातील नागरिक बळीराम महाले यांनी माजी नगरसेविका प्रियांका माने यांना कळविली असता, त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाणी पुरवठा विभागाचे बागुल यांना संपर्क साधत कळविले, त्यांनी लागलीच पिण्याच्या पाण्याची लाइन लिकेज् दुरुस्तीकाम केले. माजी नगरसेविका प्रियांका माने यांनी तत्काळ धाव घेत, महापालिका प्रशासनाशी संपर्क साधला आणि काम करून घेतले. त्याचे प्रभागातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *