नाशिक

सुमीत पगारे खूनप्रकरणातील तीन संशयित अटकेत

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
वर्चस्वाच्या वादातून झालेल्या सुमीत पगारे यांच्या खूनप्रकरणातील तीन संशयित आरोपींना गुंडाविरोधी पथक आणि नाशिकरोड युनिटच्या पोलिसांनी कल्याण फाटा परिसरातून अटक केली. राजू उर्फ रौफ रशीद शेख, जमील रंगरेज आणि आदिल सय्यद अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तिघांनाही पुढील तपासासाठी नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात
आले आहे.
17 ऑगस्ट रोजी सुमीत पगारे यांची हत्या झाल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास नाशिकरोड युनिट आणि गुंडाविरोधी पथकाकडून सुरू होता. दरम्यान, 26 सप्टेंबर रोजी संशयित राजू शेख याने या प्रकरणातील साक्षीदारांना फोन करून धमकी दिल्याचे तपासात समोर आले. या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी संशयितांना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. युनिट-1च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली.
पोलिसांनी संशयितांच्या पूर्वीच्या गुन्ह्यांचा तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तपास सुरू केला. साक्षीदारांकडेही चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान तिघेही छत्रपती संभाजीनगर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे शोध घेतला असता संशयित कल्याण फाट्याच्या दिशेने गेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी कल्याण फाटा परिसरातील विविध हॉटेल्समध्ये शोधमोहीम राबवली. राजणोली चौकातील लैला बार परिसरात तिन्ही संशयित एकत्र आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी नाशिकरोड पोलिसांच्या स्वाधीन केले. साक्षीदारांना धमकी दिल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत छत्रपती संभाजीनगरपासून कल्याण फाट्यापर्यंत संशयितांचा माग काढला. अखेर तिघांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
या कारवाईत नाशिकरोड युनिटचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक संदीप पवार, दिलीप भोई, मंगल जगताप, हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर, केतन सोनवणे, कुणाल घोरपडे, सुशांत दिघे, समाधान जाधव, भरत राऊत तसेच गुंडाविरोधी पथकाचे सुनील आडके, राहुल जगझाप, प्रदीप ठाकरे, राकेश राऊत, संदीप भुरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, सुनीता कवडे, गुरू गांगुर्डे, कल्पेश जाधव, राजेश राठोड, घनश्याम महाले आणि दयानंद सोनवणे यांनी सहभाग घेतला.

Three suspects arrested in the Sumeet Pagare murder case.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago