नाशिक

शहरात तीन हजार वितरण पेट्यांची झाकणे बंद व दुरुस्ती

नागरिकांनी सजग राहण्याचे महावितरणचे आवाहन

नाशिक: प्रतिनिधी
महावितरणच्या नाशिक परिमंडळांंतर्गत नाशिक शहरात विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने विशेष सुरक्षा मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंंतर्गत शहरातील विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेसाठी आणि शून्य अपघातासाठी नाशिक शहर विभाग-1 मध्ये 2,142, तर विभाग-2 मध्ये 1,033 ठिकाणी विविध कारणांमुळे वितरण पेटी व मिनी पिल्लर यांची उघडी असलेली एकूण तीन हजार 175 ठिकाणी नवीन झाकणे लावून दुरुस्ती करीत बंद करण्यात आली आहेत.
ग्राहकांना अखंडित, दर्जेदार वीजपुरवठा आणि विविध सेवा देण्याबरोबरच महावितरणकडून अविरतपणे नवीन यंत्रणेची उभारणी व अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेची निगा व दुरुस्तीची कामे होत असतात. मात्र, समाजविघातक वृत्तींकडून विद्युत यंत्रणेचा भाग असलेल्या वितरण पेटी व मिनी पिल्लरचे लोखंडी दाराची चोरी अथवा नुकसान करण्यात येते. यंत्रणा उघडी पडल्यामुळे संभाव्य धोका निर्माण होऊन त्यामुळे विद्युत दुर्घटना घडून महावितरणचे कर्मचारी, नागरिक अथवा प्राणी यांना विद्युत अपघात होऊन शारीरिक इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा संभाव्य दुर्घटना वेळीच टाळण्यासाठी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या निर्देशानुसार व अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वितरण पेटी व मिनी पिल्लर यांची उघडी असलेली झाकणे बंद करून तथा नसलेल्या ठिकाणी नवीन झाकणे लावून दुरुस्ती करण्यात आली. या मोहिमेत झाकणे बंद करण्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विद्युत यंत्रणा व उपकेंद्रांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी विविध तांत्रिक कामेही प्राधान्याने पूर्ण करण्यात आली. विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा उपक्रम राबविण्यासाठी नाशिक शहर विभागाचे कार्यकारी अभियंते चेतन वाडे, जगदीश जाधव यांच्यासह उपविभागीय, कक्ष अभियंता व जनमित्र यांनी सहभाग घेतला.

नजीकच्या कार्यालयाशी संपर्काचे आवाहन
आपल्या परिसरात समाजविघातक वृत्तींकडून वीज यंत्रणेचे नुकसान किंवा चोरी होत असल्याचे आढळल्यास, त्वरित महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी किंवा हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

Three thousand distribution boxes to be closed and repaired in the city

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago