नाशिक

घरफोडीचा तीन वर्षांपूर्वीचा गुन्हा उघड

6 लाख 50 हजारांचे सोन्याचे दागिने जप्त; संशयित आरोपी ताब्यात

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट-1ने तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून सुमारे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे 2022 मधील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एक व्यक्ती आनंदवली-चांदशी पूल परिसरात चोरीचे सोने घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या सूचनेनुसार पथकाने सापळा रचला.
संशयित व्यक्ती पुलाच्या दिशेने येत असताना पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव किशोर शालिक भालेराव (वय 22, रा. आनंदवली, नाशिक)
असे सांगितले.
झडतीदरम्यान आरोपीकडून 41 ग्रॅम 770 मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. त्यामध्ये मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याचा कॉइन यांचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत सुमारे 6 लाख 50 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, आरोपीने आपल्या दोन साथीदारांसह सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी गंगापूर रोड परिसरातील सावरकरनगर येथील एका बंगल्यात घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीतील वाट्याचे दागिने त्याने स्वतःकडे ठेवले होते. ते विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांच्या हाती लागल्याचे तपासात निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे 28 नोव्हेंबर 2022 रोजी गंगापूर पोलीस ठाणे येथे दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला. पुढील तपास सुरू असून, आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने
केली आहे.

Three-year-old housebreaking case revealed

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 days ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 days ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 days ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 days ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 days ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 days ago