नाशिक

अंबड-सातपूर लिंक रोडवर व्यापार्‍याचा मृत्यू

नाशिक : प्रतिनिधी
अंबड- सातपूर लिंक रोडवर सुरू असलेल्या निकृष्ट कामामुळे आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने प्रभाकर निकम (वय 49) या व्यापार्‍याचा जीव गमवावा लागला. दरम्यान, हा अपघात नसून मनपा प्रशासनाने केलेला ‘प्रशासकीय खून’ असल्याचा संताप व्यक्त करत नगरसेवक निवत्ती इंगोले व नितीन दातीर यांनी नागरिकांसह बुधवारी (दि.25) मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, यामुळे काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
अशोकनगर भागातील रहिवासी आणि अंबड येथे कपड्यांचा व्यवसाय करणारे प्रभाकर निकम मंगळवारी रात्री घरी परतत असताना हा अपघात झाला.
सध्या सातपूर-अंबड लिंक रोडचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्ता उखडलेला आहे, मात्र, तिथे कोणतेही दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग किंवा रिफ्लेक्टर्स लावलेले नाहीत. अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने निकम यांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनासमोर सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले. मात्र, आयुक्तांना आंदोलनाची कल्पना नव्हती. त्यामुळे त्या सिंहस्थ प्राधिकरणाच्या बैठकीला गेलेल्या होत्या. उपमहापौर विलास शिंदे व गटनेते अजय बोरस्ते यांनी तत्काळ आयुक्तांशी संपर्क साधून आंदोलनाची गंभीरता त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्तांनी बैठक सोडून आंदोलकांची भेट घेण्यासाठी हजर झाल्या.
महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणि प्रशासकीय अनास्थेचा पहिला बळी मंगळवारी (दि.24) रात्री गेला. या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत अधिकारी व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आयुक्तांनी आंदोलकांचे म्हणणे समजून घेतल्यानंतर ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा दिला. निकम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मुलीच्या लग्नाची बोलणी सुरू असतानाच काळाने घाला घातल्याने निकम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, महापालिका अधिकार्‍यांनी ही बाब दुलर्क्षित करत कामाच्या ठिकाणी साधी पाहणीदेखील केली नाही. त्यामुळेच संतप्त झालेल्या नगरसेवकांनी बुधवारी (दि. 25) आंदोलन केले.

शहराचा विकास व्हावा ही आमचीही इच्छा आहे, पण तो लोकांच्या जीवावर उठणारा नसावा. अंबड लिंक रोडवर काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षेची साधी त्रिसूत्रीही पाळली जात नाही. रस्ता खोदल्यानंतर तिथे बॅरिकेडिंग करणे अनिवार्य असताना ठेकेदाराने नियम धाब्यावर बसवले आहेत
– विलास शिंदे, उपमहापौर

Trader dies on Ambad-Satpur link road

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

19 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

19 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

19 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

20 hours ago