पंचवटी : प्रतिनिधी
श्री काळाराम मंदिरात दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. सियावर रामचंद्र की जय, जय सीता राम सीता, असा जयघोष आणि पारंपरिक वाद्यांचा गजरात गुरुवारी (दि. 26) रामनवमी साजरी करण्यात येणार आहे.
सध्या मंदिराच्या पूर्वेकडील भागात रामकाल पथ प्रकल्पाचे काम सुरू आहे. नाशिक महानगरपालिकेच्या निर्देशानुसार मंदिराचा पूर्व दरवाजा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने भाविकांना प्रवेश देणे शक्य होणार नाही. भाविकांची सुरक्षितता व वाढती गर्दी हे लक्षात घेऊन पर्यायी सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार मंदिरात प्रवेशासाठी शनी चौकाकडील बाजूचा उत्तर दरवाजाने व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात भाविकांचे दर्शन झाल्यानंतर त्यांना बाहेर पडण्यासाठी दक्षिण दरवाजाचा उपयोग करण्यात येणार आहे.
रामनवमीच्या दिवशी मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने पहाटे 5 ते रात्री 12 पर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. दर्शन व्यवस्थेचे नियोजन अधिक काटेकोरपणे करण्यात आले आहे. भाविकांनी मंदिर प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रामनवमी या पवित्र दिवशी भाविकांनी शांतता, संयम आणि भक्तिभाव राखून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे श्रीक ाळाराम संस्थानच्या विश्वस्त मंडळाने कळविले आहे. पंचवटीतील कपिला संगम येथील श्रीराम पर्णकुटी, श्रीराम मंदिर, वाल्मिकीनगर येथील राममंदिर, पंचवटी कारंजाजवळील रघुनाथ मंदिर, अहिल्याराम मंदिर, मुठे गल्लीतील गोरेराम मंदिर, सीतागुंफाजवळील गोरेराम मंदिर येथे रामनवमीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीराम नवमी उत्सवाला मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या दिवशी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने कळविले आहे.
VIP darshan closed at Kalaram temple
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…