नाशिक

गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील वाहतुकीत बदल

सिडको : प्रतिनिधी
शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात मोठे बदल केले आहेत. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
नाशिक शहराची मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक 25 सप्टेंबर रोजी वाकडी बारव (चौकमंडई) येथून सुरू होणार आहे. जहांगिर मशीद, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, दूध बाजार चौक, बादशाही लॉज कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, गो. ह. देशपांडे पथ, धुमाळ पॉईंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल, स्वामी विवेकानंद रोड, अशोकस्तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, परशुरामपुरीया रोड, कपालेश्वर मंदिर, भाजी बाजार आणि म्हसोबा पटांगण येथील विसर्जनस्थळी मिरवणूक पोहोचणार आहे.
या मिरवणुकीमुळे मिरवणूक मार्गासह शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर सर्वसामान्य वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
मिरवणूक मार्गावरील वाहतूक निर्बंध 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत लागू राहतील. मिरवणुकीतील वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच संबंधित परिसरातील स्थानिक रहिवाशांची वाहने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.
विसर्जन मिरवणुकीच्या काळात गर्दी टाळण्यासाठी वाहनचालकांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणांपासून दूर असलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. परिस्थितीनुसार वाहतूक मार्ग आणि वेळेत ऐनवेळी बदल करण्याचा अधिकारही पोलिसांनी राखून ठेवला आहे.

Traffic changes in the city due to the Ganesh immersion procession.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मृतदेह बोलत नसतो, पण पोस्टमार्टम सत्य सांगते!

- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…

14 hours ago

यिन-यांग

- वासवदत्ता अग्निहोत्री पहिले बीज की त्या आधी रोप? आधी कोंबडी की आधी अंडी? हे…

14 hours ago

समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी, नवीन सौरतंत्रज्ञान

- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…

14 hours ago

डिजिटल दरोडा!

- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…

14 hours ago

भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत नवी भरारी

आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…

14 hours ago

युद्ध थांबल्याचं तुणतुणं

युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…

14 hours ago