नाशिक

महात्मानगरजवळील खाऊगल्लीमुळे वाहतूक कोंडी

महापालिका, पोलिसांचेही दुर्लक्ष; वाहनांच्या लागतात रांगा

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील विविध भागांत दररोज अतिक्रमण निर्मूलन मोहीम महापालिकेमार्फत राबविण्यात येत असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे रस्ते मोकळे होत आहेत. महापालिकेच्या या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत असताना एबीबी सर्कलजवळील आइस्क्रीम विक्रीच्या हातगाडीमुळे एबीबी सर्कलवर दररोज सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
आइस्क्रीम खाण्यासाठी येणारे नागरिक रस्त्यातच वाहने उभी करत आहेत. निम्मा रस्ता वाहनांनी व्यापला जात आहे. मात्र, महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि गंगापूर पोलिस याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. या आइस्क्रीम विक्रेत्याला नेमके कुणाचे अभय आहे? याकडे आता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
एबीबी सर्कलजवळ दररोज सायंकाळी खाद्यपदार्थांची दुकाने लागतात. त्यात आइस्क्रीम विक्रेत्याच्या हातगाड्यावरच सर्वाधिक गर्दी असते. शहरातील इतर दुकाने दहाच्या आत बंद होतात; परंतु ही आइस्क्रीमची विक्री रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असते. विशेष म्हणजे, पोलिस व्हॅन सायरन वाजवत येते. काही वेळ थांबते. या व्हॅनमधील कर्मचार्‍यांनाही आइस्क्रीमचा स्वाद दिला जातो. त्यामुळे तेदेखील शांततेत निघून जातात. मात्र, याचा त्रास या मार्गावरील वाहनधारकांना सहन करावा लागतो. याठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. सध्या त्र्यंबकरोडचे काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी मार्गातूनच दुहेरी वाहतूक केली जात आहे. त्यात आइस्क्रीम खाण्यासाठी थांबणारे रस्त्यात वाहने, कार पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडते. याबाबत नागरिक वारंवार तक्रारी करतात. मात्र, महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. महापालिका शहरभर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत असताना या ठिकाणी मोहीम न राबविण्यामागचे नेमके कारण काय आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळच हे सारे अतिक्रमण आहे. विशेष म्हणजे, सध्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता आधीच अरुंद झाला असताना या ठिकाणाहून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरील कसरत करावी लागते. यापूर्वी याच ठिकाणी गर्दीमुळे अपघात होऊन एका मुलीला प्राणही गमवावे लागलेले आहेत. तरीही महापालिका एबीबी सर्कलजळील विक्रेत्यावर कारवाई करण्यास धजावत नसल्याने आता पोलिसांनीच कायद्याचा दंडुका उगारण्याची गरज आहे.

 

 

 

Traffic jam due to Khaugalli near Mahatmanagar

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago