चार लाख भाविकांची मांदियाळी; उपमुख्यमंत्री शिंदे करणार महापूजा
सोलापूर : सूर्यकांत आसबे
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या पंढरपूरनगरीत कार्तिकी यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून भाविकांची मोठी गर्दी पंढरीत दाखल झाली आहे. भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण पंढरीनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. यात्रेसाठी शुक्रवार सायंकाळपर्यंत सुमारे चार लाख भाविक दाखल झाल्याने मंदिर परिसरासह शहरातील प्रमुख रस्ते, मठ, धर्मशाळा आणि भक्तनिवास भाविकांनी गजबजून गेले आहेत.
श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढल्याने दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे पोहोचली आहे. ’विठ्ठल-विठ्ठल’, ’ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ’पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ अशा जयघोषाने चंद्रभागेचा परिसर दुमदुमून गेला आहे. अनेक भाविक कुटुंबासह पंढरीत दाखल झाले आहेत. चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा आणि विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू आहे. कार्तिकी शुद्ध एकादशीचा मुख्य धार्मिक सोहळा शनिवार, 21 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे. पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी हा पूजाविधी पार पडणार असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे. यावेळी मानाच्या वारकरी दाम्पत्यालाही महापूजेचा मान मिळणार आहे.
कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून दिंड्या तसेच खाजगी वाहनांमधून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत .भाविकांच्या गर्दीने पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. चंद्रभागेच्या पैलतीरावरील 65 एकर भक्तीसागर परिसरातील 725 प्लॉट पैकी 350 प्लॉटचे वाटप झाले आहे. सोबत आलेले सुमारे दीड लाखाहून अधिक भाविक तंबू आणि राहुट्यामध्ये मुक्कामाला आहेत .रिद्धी -सिद्धी दर्शन मंडप परिसरात कायमस्वरूपी दर्शन हॉलचे बांधकाम सुरू असल्यामुळे मंदिर समितीने गोपाळपुर – स्वेरी कॉलेज रस्त्यावरील खाजगी जागेत तात्पुरत्या स्वरूपात 15 पत्रा शेड उभारून भाविकांना दर्शन रांगेची व्यवस्था करून दिली आहे. पदस्पर्श दर्शनासाठी दहा ते बारा तासांचा अवधी लागत आहे.
Pandharpur bustles for the Kartiki Yatra
चाकूहल्ल्यात विक्रेता जखमी सिडको : प्रतिनिधी म्हसरूळ परिसरातील मेहेरधाम बसथांब्याजवळ फळविक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दोघांनी…
पूवर्र्वैमनस्यातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचवटी : प्रतिनिधी शहरातील पंचवटी परिसरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा डोके…
सर्व मंत्र्यांसोबत साडेतीन तास मंथनानंतर मोदी-शहा-नितीन नवीन यांच्यात दीड तास बैठक नवी दिल्ली । प्रतिनिधी…
रुग्णालयातून परतणार्या सहकार्यांचाही अपघात नांदगाव : प्रतिनिधी वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी येणार्या प्राध्यापकाचा हृदयविकारा-च्या तीव्र…
फिक्कीतील भाषणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल नवी दिल्ली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याचे वृत्त; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कारवाई; पक्षशिस्तभंगाचा ठपका नाशिक :…