नाशिक

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना अटक

इतर आरोपी पसार; अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. उर्वरित संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या फरार संशयित आरोपींचा पोलिस तपास करीत आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मार्चच्या पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सिडको परिसरातील एकदंतनगर, फडोळ मळा येथील सुमारे 100 एकर मोकळ्या मैदानात काही जण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली. संबंधित माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच काही संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
या कारवाईदरम्यान पार्थ हेमंत मोकळ (वय 19 रा. लोकमान्यनगर, सिडको) आणि मंगेश नंदू आहेर (वय 21, रा. पवननगर, सिडको) यांना अटक करण्यात आली. इतर आरोपींमध्ये मोमीन, फरान, शुभम खरात, अक्षय क्षीरसागर, रोशन मुर्तडक आणि गौरव बागूल यांचा समावेश असून, त्यांचा शोध सुरू आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी विविध प्रकारची शस्त्रे व साहित्य जप्त केले आहे. यात चाकू, हातोडा, करवत पान, हूक, कटावणी, लोखंडी रॉड, दांडे यांसारखी धोकादायक साधने, तसेच चेहर्‍यावर लावण्याचे मास्क, हातमोजे, दोरी, हातरुमाल आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश आहे. याशिवाय संशयितांकडून एक बॅग, तसेच दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 80 हजार शंभर रुपये असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात संबंधित आरोपी हे एकत्र येऊन दरोडा घालण्याच्या उद्देशाने पूर्वतयारी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिस हवालदार संदीप दिलीप भुरे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर करत आहेत.

Two accused arrested for preparing to commit robbery

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

3 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

3 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

3 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

3 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

4 hours ago