सिडको : विशेष प्रतिनिधी
इंदिरानगर विभागातील वडाळा परिसरात महापालिकेच्या घरकुल योजनेतील अतिक्रमणांवर महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई करत संबंधित जागा मोकळी केली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
घरकुल योजनेंंतर्गत असलेल्या या परिसरात काही ठिकाणी अनधिकृतपणे किराणा दुकाने, भंगाराचे गाळे तसेच बकर्यांचे शेड उभारण्यात आले होते. यामुळे परिसराचे स्वरूप बकाल झाले होते. रहिवाशांना त्यांच्या दुचाकी उभ्या करण्यासाठीदेखील जागा उपलब्ध राहत नव्हती. परिणामी नागरिकांना दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या.
या अतिक्रमणांविरोधात स्थानिक नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत संबंधित जागेवरील सर्व अनधिकृत बांधकामे हटवली. यानंतर परिसर मोकळा झाल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला. परिसरात स्वच्छता आणि सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली आहे.
अतिक्रमण हटवल्यानंतर घरकुल योजनेतील रहिवाशांनी महापालिका अतिक्रमण विभाग तसेच नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांचे आभार व्यक्त केले.
नागरिकांनी पुढील काळात अशा प्रकारचे अतिक्रमण होऊ नये यासाठीही प्रशासनाने लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Encroachments in Municipal Housing Scheme removed
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…