हजारो रुपयांचा मॅफेड्रॉन जप्त
सिडको ः विशेष प्रतिनिधी
विहितगाव परिसरात एम.डी. (मॅफेड्रॉन) सारख्या अमली पदार्थांची विक्री करणार्या दोन तरुणांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 30 हजार रुपये किमतीचा मॅफेड्रॉन जप्त करण्यात आला असून, उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 29 मे 2025 रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी सोमेश्वर उर्फ बाळा उत्तम हांगरगे (वय 27, रा. स्वागत बिल्डिंग, विहितगाव) आणि साहिल मोहन निकम (वय 23, रा. हरीपुरा अपार्टमेंट, विहितगाव) हे
मॅफेड्रॉन विक्रीसाठी महाराजा बसस्टॉप परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने सापळा रचून त्यांना पकडले. त्यांच्याकडून 6 ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत 30,000 रुपये इतकी आहे. याप्रकरणी दोघांविरोधात एन.डी.पी.एस. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.
दरम्यान, सोमेश्वर हांगरगे याच्यावर यापूर्वीही उपनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, पोहवा भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, पोलीस नाईक संतोष सौंदाणे, पोलीस अंमलदार गणेश वडजे, अनिरुद्ध येवले, बाळासाहेब नांदे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे आणि महिला पोलीस अर्चना भड आदींनी केली.
राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…
जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर उपचार सुरू मोखाडा: …
आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…
दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…