आरोग्यासाठी अन्न किती महत्त्वाचे आहे, हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. रिकाम्या पोटी कोणतेही आम्लयुक्त अन्न आतड्याच्या अस्तरावर परिणाम करते आणि यामुळे संसर्गाचा धोका असतो. बराच वेळ झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा पचनसंस्था काम करू लागते, परंतु त्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे आणि उठल्यानंतर किमान दोन तासांनी नाश्ता केला पाहिजे.
मसालेदार जेवण
रिकाम्या पोटी मसाले आणि मिरच्या खाल्ल्याने पोटाच्या अस्तराला त्रास होतो, ज्यामुळे आम्लीय प्रतिक्रिया आणि पोटात मुरडून येते. मसाले तिखट असतात, जे अपचन वाढवू शकतात. त्यामुळे सकाळी तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळा. बरेच लोक समोसे, कचोरी, पकोडे आदींचे सेवन करतात. सकाळच्या नाश्त्यात ते टाळा.
ज्यूस ः
आपल्यापैकी अनेक जण दिवसाची सुरुवात करण्यासाठी एक ग्लास फळांचा ज्यूस घेतात, परंतु हे अजिबात चांगले नाही कारण रिकाम्या पोटी ज्यूस प्याल्याने पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो, जे शरीरासाठी चांगले नाही.
दही ः
दह्यात लॅक्टिक अॅसिड असते, जे पोटातील अॅसिडिटी पातळीला त्रास देते. रिकाम्या पोटी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने त्यातील लॅक्टिक अॅसिड पोटातील चांगले बॅक्टेरिया नष्ट करते, ज्यामुळे अॅसिडिटी वाढते. त्यामुळे सकाळी दही खाऊ नये.
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…
शेतकर्याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…
समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…