नाशिक

गणेशमूर्ती विसर्जन करताना दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

नामपूर येथील मोसम नदीपात्रातील घटना

नामपूर : वार्ताहर
बागलाण तालुक्यातील नामपूर येथे गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान मोसम नदीपात्रात बुडून दोन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शुक्रवारी (दि. 18) दुपारी घडलेल्या या घटनेमुळे नामपूर परिसरात शोककळा पसरली.
अथर्व दीपक पगार (वय 17, रा. उत्राणे) आणि प्रसाद दादाजी वाघ (वय 18, रा. नामपूर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोन्ही विद्यार्थी नामपूर-मालेगाव रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयासमोर असलेल्या गजानन संकुलातील ‘एलिक्झर लर्निंग क्लासेस’मध्ये शिक्षण घेत होते. क्लासच्या विद्यार्थ्यांनी बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. ठरल्याप्रमाणे पाचव्या दिवशी शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास क्लासमधील विद्यार्थी बाप्पाच्या विसर्जनासाठी वाजतगाजत मोसम नदीपात्रात गेले होते. विसर्जन मिरवणूक आणि आनंदाचे वातावरण असतानाच अचानक घडलेल्या या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याच दरम्यान, त्यांच्यासोबत असलेला विरेंद्र विशाल अहिरे (वय 17) याचाही पाय घसरला होता; परंतु त्याचे नशीब बलवत्तर म्हणून प्रसंगावधानाने तो तात्काळ पाण्याच्या बाहेर आल्याने थोडक्यात बचावला. घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे आणि एस. के. मगर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच पुढील चौकशीसाठी क्लासचे संचालक अशोक पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच नामपूर ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक आणि नागरिकांनी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या लेकरांच्या जाण्याने नातेवाइकांनी केलेल्या हंबरड्याने उपस्थितांचे मन हेलावून गेले. दरम्यान, गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणूक काढताना आणि नदीपात्रात जाताना नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जायखेडा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले.

Two students drown during Ganesh idol immersion.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 days ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 days ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 days ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 days ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 days ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 days ago