सिडको : प्रतिनिधी
चोरीची अॅक्टिव्हा मोपेड विक्री करण्यासाठी पाथर्डी फाट्यावरील उड्डाणपुलाखाली आलेल्या संशयिताला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. राहुल दत्तू जाधव (36, रा. पुष्कराज अपार्टमेंट, वडाळा-पाथर्डी रोड, कलानगर, नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 55 हजार रुपये किमतीची पांढर्या रंगाची अॅक्टिव्हा मोपेड जप्त करण्यात आली आहे.
नाशिक शहर परिसरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या उद्देशाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांतील संशयितांचा शोध घेत होते. याच दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार मनोज शिंदे आणि संतोष सुपेकर यांना पाथर्डी फाट्यावरील टोयोटो शोरूमसमोरील उड्डाणपुलाखाली एक व्यक्ती चोरीची अॅक्टिव्हा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी तातडीने पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी तसेच मनोज शिंदे आणि संतोष सुपेकर यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा लावला. काही वेळाने अॅक्टिव्हा मोपेडसह आलेल्या राहुल जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने ही मोपेड लेखानगर येथील हॉटेल स्पॅक परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून 55 हजार रुपये किमतीची अॅक्टिव्हा जप्त केली. जाधव याच्या कबुलीवरून अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेला मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी आणि जप्त केलेली दुचाकी पुढील कारवाईसाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, मनोज शिंदे आणि संतोष सुपेकर यांच्या पथकाने केली.
Suspect apprehended while attempting to sell a stolen Activa at Pathardi Phata.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…