नाशिक

‘ई-चलन’ कारवाईनंतरही सिग्नल जम्पचे प्रकार

वाहनधारकांकडून नियमांचे सर्रासपणे उल्लंघन

सिग्नलची ऐशीतैशी
रेड सिग्नल असूनही नियमांचे उल्लंघन करत वाहनधारक सर्रास गाड्या चालवत असल्याचे चित्र दिसत आहे. यात सिटीलिंकचे चालकही मागे नाहीत.

नाशिक : प्रतिनिधी
शहर पोलीस आयुक्तालयाने वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करून ई-चलन कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांत तीनशेहून अधिक वाहनधारकांच्या मोबाइलवर दंडाचा मेसेज पडला आहे. पण तरीही सर्रासपणे सिग्नल जम्प करण्याचे प्रकार घडतच आहेत. सिग्नल जम्प करण्यात सिटीलिंकचे चालकही आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही मोहीम अधिक व्यापक केल्याशिवाय वाहतुकीला शिस्त लागणे अवघड आहे.
नाशिकमध्ये सध्या वेगवेगळ्या भागांत सिंहस्थाची कामे सुरू आहेत. रस्ते खोदल्यामुळे वाहतुकीचा पुरता इस्कोट झाला आहे. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर द्वारका येथील भुयारी मार्गाचेही काम वेगात सुरू आहे. काही भागांत जलवाहिनीची कामे सुरू आहेत. या सर्वांमुळे वाहतुकीची कोंडी होत असताना शहर पोलिसांकडून वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, पोलिसांच्या या प्रयत्नांना वाहनधारकांबरोबरच सिटीलिंक कंपनीचे चालकही सर्रासपणे नियम तोडत आहेत.
सिग्नल जम्प केल्यास ई-चलनद्वारे दंड केला जात असला, तरी त्याचा कोणताच धाक दिसत नाही. रेड सिग्नल असला तरी सिटीलिंकच्या बसेस सर्रासपणे धावत आहेत. त्यामुळे सिटीलिंकच्या चालकांना या दंडात्मक कारवाईचे काहीच सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. अशीच परिस्थिती रिक्षाचालकांचीही आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविण्यात रिक्षाचालकच आघाडीवर आहेत. नो एन्ट्री असूनही रिक्षाचालक अगदी फ्रंटसीट प्रवासी बसवून धूम स्टाइलने रिक्षा दामटत असल्याने पोलिसांनी ई-चलनबरोबरच चौकाचौकांत वाहतूक पोलीस उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Types of signal jumps even after the ‘e-challan’ action

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago