धाराशिवमध्ये पहाटे धाड, सहा संशयित ताब्यात; दोन एक्सयूव्ही जप्त
सिन्नर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर वाहनांचे टायर पंक्चर करून प्रवाशांना लुटणार्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी छडा लावला आहे. सिन्नर तालुक्यातील वावी परिसरात वाहनांना लक्ष्य करून रस्तालूट करणार्या या आंतरजिल्हा टोळीतील सहा संशयितांना धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथून ताब्यात घेण्यात आले. सायाळे ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे संशयितांच्या वाहनांचा माग लागला आणि त्यानंतर तपासाची दिशा थेट धाराशिवकडे वळली. दरोड्यात वापरलेल्या दोन महिंद्रा एक्सयूव्ही-500 वाहनांचाही पोलिसांनी ताबा घेतला आहे.
पोलिसांनी नितीन ऊर्फ सुनील हिरामण शिंदे (34, रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव), गोविंद शिवाजी पवार (19, रा. लक्ष्मीपिढी, ता. वाशी, जि. धाराशिव), अशोक हिरामण शिंदे (37, रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव), अर्जुन व्यंकट पवार (55), धनाजी अर्जुन पवार (22, दोघे रा. येरमाळा, ता. कळंब, जि. धाराशिव) आणि लखन भारत काळे (22, रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेतले आहे. वावी पोलिसांनी सहा आरोपींना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सिन्नर न्यायालयात हजर केले. पोलिसांनी तपासकामी 14 दिवसांची पोलीस कोठरी मागितली. न्यायालयाने आठ दिवसांची कोठडी मंजूर केली.
दरोड्यासाठी वापरण्यात आलेली एमएच 42-एच 9975 आणि एमएच 42-के1777 क्रमांकाची दोन महिंद्रा एक्सयूव्ही- 500 ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना वावी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींचे आणखी साथीदार फरार असून त्यांचा शोध घेणे, लुटीचा मुद्देमाल हस्तगत करणे, गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने जप्त करण्यात आली असून आणखी वाहने असतील तर ती निष्पन्न करणे, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे हस्तगत करणे, आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे अन्य ठिकाणी केले असल्यास त्यांची कबुली मिळवणे कामे पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती.
गुरुवारी (दि. 27) मध्यरात्री समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली येथील वाहनांना अडथळे निर्माण करून दरोडेखोरांनी प्रवाशांना लक्ष्य केले होते. वाहनांचे टायर पंक्चर करून लूट करण्यात आली.
आधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या महामार्गावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी तपासासाठी विविध पथके रवाना केली. स्थानिक गुन्हे शाखा आणि तांत्रिक विश्लेषण विभागाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी सुरू केली. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार सलग 48 तास तपास करीत होते. चिखल, थकवा आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता पथकाने संशयितांचा माग काढला. अखेर धाराशिवमध्ये कारवाई करून टोळीतील सहा संशयितांना जेरबंद करण्यात आले. ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती विमला एम. आणि निफाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष गांगुर्डे तसेच पोलीस अंमलदार सतीश जगताप, सचिन गवळी, दीपक गुंजाळ, चंद्रकांत निर्मळ, श्रीकांत गारुंगे, संदीप कडाळे, प्रवीण काकड, विश्वनाथ काकड, ज्ञानेश्वर सानप, समाधान बोराडे, कपालेश्वर बिकले, मंगेश गोसावी, बाबा पवार, कैलास मानकर, किशोर बोडके, मयूर कांगणे, बालाजी कुंटेवाड आणि आबा पिसाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.
‘Tyre-Puncture Gang’ on Samruddhi finally nabbed.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…