नाशिक

रामशेज गडावर अविस्मरणीय मशाल, दीपोत्सव

नाशिक/ ओझर : वार्ताहर
पहिला दिवा त्या देवाला ज्यांच्यामुळे देवळातील देव शिल्लक आहेत, या संकल्पनेंतर्गत रामशेज गडावर सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक व सकल मराठा परिवार नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव व मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व स्वराज्य रक्षणासाठी प्राणार्पण करणार्‍या मावळ्यांना दिव्यांच्या व मशालींच्या तेजातून वंदन करण्यासाठी रविवारी गडावर शेकडो दुर्गसेवक, शिवप्रेमी व गडप्रेमी एकवटले होते. महोत्सवात रामशेज गडावर 51 मशाली, 101 टेंभे व 1001 दिवे लावून गड उजळून निघाला. सुरुवात गड पायथ्याच्या आशेवाडी गावातून शिवरायांची पालखी काढून करण्यात आली. याप्रसंगी गोंधळीच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवरायांवरील पोवाड्यांनी वातावरण शिवमय केले. गडावर पोहोचून सर्वांत आधी गड स्वच्छता करून रांगोळ्या काढून महाद्वार फुलांनी सजविण्यात आले. गडावर पुन्हा शिवरायांच्या पालखीची मिरवणूक काढून ध्वजपूजन व गडपूजन करण्यात आले. गडावरील शिवरायांच्या मूर्तीची पूजा माताभगिनींच्या हस्ते करून मूर्तीवर उपस्थितांनी पुष्पवर्षाव करून महाराजांचा जयघोष करून वातावरण दणाणून सोडले. याप्रसंगी शिवव्याख्यात्या साक्षी ढगे व शिवव्याख्याते समाधान हेगडे पाटील यांचे शिवव्याख्यान झाले. त्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी मर्दानी खेळ दाखवून शिवकाळ ताजा केला. या कार्यक्रमासाठी लहानथोरांपासून सर्वांनीच हजेरी लावली व या महोत्सवाला सुख सोहळा बनवले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल मराठा परिवाराची टीम व सुधीर पौळ, गोविंद जाधव पाटील, प्रवीण साळुंके, हेमंत भोईटे, अनिकेत गायकवाड, हेमंत पाटील, केतन शिंदे, विकास कोकणे, किरण नळगे, दर्शन जाधव, आकाश पिळोदकर व सर्व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभागाच्या दुर्ग सेवकांनी नियोजन केले.

 

Gavkari Admin

Recent Posts

सिडकोत हिट अँड रन; शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू

शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…

9 hours ago

लाडक्या बहिणींबाबत शासनाने घेतला आता हा निर्णय

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…

2 days ago

राधाकृष्ण नगरात स्वयंघोषित भाईचा राडा

राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…

2 days ago

अपघातग्रस्त तरुणांवर उपचारास सिव्हिलचा नकार, छावा संघटना झाली आक्रमक, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार तक्रार

जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…

2 days ago

वृद्धेच्या गळ्याला चाकू लावत उकळले वीस लाख, पवन पवार विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…

2 days ago

माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याचे पाय अजून खोलात

  जमीन खंडणी प्रकरणी  सातपुर पोलिसात गुन्हा सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर परिसरात खंडणी व…

2 days ago